Gudi Padwa 2021: रॅली-मिरवणूक काढण्यास बंदी, गुढीपाडव्यासाठी नवी नियमावली जाहीर

'कोविड- 19 या विषाणूचा वाढता फैला रोखण्याच्या दृष्ट्टीने यार्षी गुढीपाडव्यावनवमत्त पालखी, दिंडी, प्रभात फे री, बाईक रॅली मिरवणुका काढण्यात येऊ नये'

0 0

मुंबई : राज्यात कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढत असल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले असून लवकरच लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा होण्याची शक्यता आहे. मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याच्या (,  Gudi Padwa 2021) निमित्ताने राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे.  कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मराठी नवीन वर्षाचे उद्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने साजरा केला जाणार आहे. पण, यंदाच्या वर्षीही गुढीपाडवा हा घरातच साजरा करावा लागणार आहे. गेल्या वर्षी राज्यात कोविड या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन आजपर्यंत झालेले  सण/उत्सव हे अत्यंत साध्या पद्धतीने लोकांनी एकत्र न जमता साजरे केलेले आहेत.

सध्या कोरोनाच्या संसर्गाच्या प्रमाणात गेल्या वर्षी पेक्षा जास्त वाढ होत आहे. त्यामुळे यावर्षी गुढीपाडवा हा सण कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्ट्टीने अत्यंत साधेपणाने सकाळी 7.00 वाजेपासून संध्याकाळी 8.00 वाजेण्यापुर्वी साजरा करणे अपेक्षित आहे.

राज्यात काही ठिकाणी गुढीपाडवा हा सण पारंपारिक वेशभूषा परिधान करुन तसंच सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करुन नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात येत असतो. कोविड- 19 या विषाणूचा वाढता फैला रोखण्याच्या दृष्ट्टीने यार्षी गुढीपाडव्यावनवमत्त पालखी, दिंडी, प्रभात

फे री, बाईक रॅली मिरवणुका काढण्यात येऊ नयेत तसंच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये.

सार्वजनिक ठिकाणी एकापेक्षा 5 लोकांनी एकत्र न येता सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून घरगुती गुढी उभारुन हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा, असे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.

तसंच गुढीपाडव्याच्या निमित्ताने रक्तदान शिबीरे प्रशासनाच्या पूर्व परवानगीने आयोजित करता येणारआहे.

Leave A Reply

Your email address will not be published.