एलसीबीची आतापर्यंतची मोठी कारवाई, गुटखा तस्कर मेहबूबच्या आवळल्या मुसक्या

एलसीबीने धडक कारवाई करून तब्बल २९ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व गुटखा वाहून नेणारे ८ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ३७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

0 6

हायलाइट्स:

  • एलसीबीची आतापर्यंत मोठी कारवाई
  • गुटखा तस्कर मेहबूबच्या आवळल्या मुसक्या
  • धडक कारवाईमुळे आर्णी तालुक्यातील गुटखा तस्करांचे धाबे दणाणले

यवतमाळ : भंगार व्यवसायाच्या आड अर्ध्या महाराष्ट्रात गुटखा तस्करी करणाऱ्या मेहबूबवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करून तब्बल २९ लाखाचा प्रतिबंधक गुटखा जप्त करण्यात आला. तसेच कुख्यात गुटखा तस्कर मेहबूब याच्यासह तीन आरोपी व एक टाटा आयशर एलसीबीने जप्त केला असून एलसीबीच्या धडक कारवाईमुळे आर्णी तालुक्यातील गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहे.

आर्णी शहरातील डोंगा कॉलनी येथे भंगार व्यवसायाच्या आड शेख मेहबूब शेख सादिक याने अर्ध्या महाराष्ट्रात गुटख्याचे साम्राज्य निर्माण केले आहे. प्रशासनातील काहींचा वरदहस्त असल्यामुळे शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या डोंगा कॉलनीत खुलेआम गुटख्याची विक्री केल्या जाते. नुकत्याच 3 दिवासआधी डोंगा कॉलनी येथील भंगारच्या दुकानावर स्थानिक पोलिसांनी कारवाई करून ९३ हजाराचा गुटखा पकडण्यात आला होता. परंतु त्यानंतरही आज सकाळी वाहन क्रमांक एमएच २९ सी ५६८४ टाटा आयशरमध्ये प्रतिबंधित गुटखा आर्णीकडे जात असल्याची गुप्त माहिती एलसीबीला मिळाली.

या माहितीच्या आधारे सापळा रचून सदर संशयित ट्रक एलसीबीने ताब्यात घेतला व प्राप्त माहितीनुसार मेहबूब याच्या कुऱ्हानजीक असलेल्या शेतात, बुटले पेट्रोल पंप नजीक व डोंगा कॉलनी स्थित गोदमावर धाड टाकण्यात आली. एलसीबीने धडक कारवाई करून तब्बल २९ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व गुटखा वाहून नेणारे ८ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ३७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गुटखा तस्कर शेख मेहबूब शेख सादिक(३८), आरिफ रौफ बैलीम (२९) वाहन चालक, शेख सलीम शेख गफ्फार, आतिष शालिकाराव कोडापे(३८)यांना जेरबंद करून अन्न सुरक्षा मानक कायद्यान्वये अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.