अकोला, बुलडाण्यात गारपीट; पिकांचे नुकसान

0 0

अकोला: पश्चिम वऱ्हाडात बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अकोला जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पातूर तालुक्यातील काही भागात विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला असून, अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपालावर्गीय पिकांना बसला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. गत तीन दिवसांपासून अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. रविवार व सोमवारी काही भागात हलक्या स्वरुपात सरी कोसळल्या होत्या. बुधवारी सायंकाळी वादळी वारे, विजेचा कडकडाट व गारांसह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. मूर्तिजापूर, तेल्हारा तालुक्यातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. बुलडाणा जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली चिखली तालुक्यातील शेलगाव ज, खंडाळा म, मुंगसरी, आन्वी भागात जोरदार गारपीट व मुसळधार पाऊस झाला तसेच डोणगाव व इतर गावांमध्येही अवकाळी पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी विजांचा कडकडाट आणि वादळवारा सुटल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली. गत तीन, चार दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून, शिरपूर, भर जहाँगीर परिसरात मंगळवारी काही प्रमाणात अवकाळी पाऊसदेखील पडला.

बुधवारी सायंकाळी ६ वाजतानंतर वाशिम शहरासह जिल्ह्यात वादळवारा आणि विजांचा कडकडाट झाल्याने जवळपास दीड ते दोन तास वीजपुरवठाही खंडीत होता. झाला

जिल्ह्यात सध्या हळद काढणी, बिजवाई कांद्याचा हंगाम सुरू असल्याने आणि त्यातच वादळवारा सुटल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.