राजसाहेबांचे पत्र गेल्यावर आली हाफकिनला परवानगी; याला म्हणतात ‘ठाकरे ब्रँड’

0 4

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
मुंबई : राज्यात कोरोनाने अक्षरशः विळखा घातलेला पहायला मिळत आहे. योग्यवेळी उपचार न मिळाल्याने दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आता केंद्र सरकारने हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिली आहे. मात्र या परवानगीचे श्रेय मनसेने घेतलेले पहायला मिळत आहे.

“केंद्र सरकारकडून असेच सहकार्य मिळाल्यास आपण एकत्रितपणे या संकटावर मात करु.” असे बोल बोलत केंद्र सरकारने हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे आभार मानलेत आहेत.

तसेच, यापूर्वी लसीला मान्यता मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानल्याने, “कोरोना काळात ‘राजकारण’ नको म्हणणाऱ्यांनी आभार मानायला हरकत नव्हती.” अस म्हणत मनसे नेते संदिप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे.

याचसोबत, राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिनला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पण त्यांची परवानगी राजसाहेबांचे पत्र गेल्यावर आली. याला म्हणतात ‘ठाकरे ब्रँड’ असे मनसे नेते संदिप देशपांडे यांनी म्हणले आहे.

दरम्यान, हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळताच लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.