पाकिस्तानी TikTok स्टार Hamidullah चा खोट्या आत्महत्येच्या स्टंट चुकला आणि गोळी लागून जागीच जीव गेला

Hamidullah च्या मित्रांनी त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडीयात टिकटॉक वर अपलोड केली नाही पण एकमेकांना शेअर केली होती. त्यामुळे इतर समाजमाध्यमांवर ती नंतर वायरल झाली.

0 31

पाकिस्तानच्या पेशावर मध्ये एक तरूण मुलगा आत्महत्येच्या नाटकाचा व्हीडिओ शूट करताना चुकून गोळी शूट झाल्याने मृत्यूमुखी पडल्याची एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मृत्यूमुखी पडलेला तरूण एक टिकटॉक स्टार होता. त्याचा मित्र टिकटॉक (TikTok Video) साठी हा व्हिडिओ शूट करत होता. हमिदुल्ला (Hamidullah) असं या तरूण मुलाचं नाव असून तो अवघ्या 19 वर्षांचा होता.

AFP च्या वृत्तानुसार, हमिदुल्ला हा लोकली सोशल मीडीयावर प्रसिद्ध होता. त्याने त्याच्या मित्राची पिस्तुल हातामध्ये धरली होती. कपाळावर त्याने ती रोखुन ओढली. दरम्यान त्याला ही पिस्तुल लोडेड असल्याची माहिती नव्हती असे देखील पोलिस म्हणाले. हा मुलगा या प्रकरानंतर जागीच मृत्यूमुखी पडला.

Hamidullah च्या मित्रांनी त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडीयात टिकटॉक वर अपलोड केली नाही पण एकमेकांना शेअर केली होती. त्यामुळे इतर समाजमाध्यमांवर ती नंतर वायरल झाली. हमिदुल्लाचे 8000 फॉलोवर्स होते तर त्याने 600 हून अधिक क्लिप्स टिकटॉक वर शेअर केल्या असल्याने तो त्याच्या परिसरामध्ये प्रसिद्ध होता. मित्रांसोबत प्रॅन्क करणं, क्रिकेट आणि फीचर व्हिडिओ अशा प्रकारचे व्हिडीओ तो टिकटॉक वर टाकत होता.

काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे पाकिस्तानमध्ये एकजण गन साफ करताना त्यामधून गोळी सुटल्याने मृत्युमुखी पडला होता. तर रावळपिंडी मध्ये ट्रेनचा धक्क लागून एक टिकटॉक स्टार मृत्यूमुखी पडला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.