Happy Birthday Rohit Sharma: टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आहे ‘या’ 5 विश्वविक्रमांचा बादशाह, जाणून जाल चक्रावून

आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सच्या साथीदारांसह आपला 34वा वाढदिवस साजरा करेल

0 19

भारतीय क्रिकेटच्या आधुनिक काळातील एक महान खेळाडू, रोहित शर्मा आपल्या आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सच्या साथीदारांसह आपला 34वा वाढदिवस साजरा करेल. सर्वाधिक टीका सहन करणाऱ्या क्रिकेटरपासून सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक, ‘हिटमॅन’ एक महान फलंदाज बनला आहे. आज रोहितच्या वाढदिवशी आपण त्याच्या टॉप-5 वर्ल्ड रेकॉर्डबद्दल जाणून घेऊया जे जाणून दिग्गज फलंदाज ही चक्रावून जातील.

1. 2019 हे रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा होता. 2019 च्या विश्वचषकात रोहितने 5 विश्वविक्रमी शतकांसह रोहितने 9 सामन्यात सर्वाधिक 648 धावा ठोकल्या. शिवाय, विश्वचषकाच्या एका आवृत्तीत पाच शतकी धावा करणारा रोहित पहिला खेळाडू आहे.

2. 2019 मध्ये रोहितच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा शतके होती जी सात वेगवेगळ्या संघाविरुद्ध त्याने केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका कॅलेंडर वर्षात सात वेगवेगळ्या टीम विरुद्ध शतक ठोकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. वर्ल्ड कप 2019 दरम्यान त्याने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांग्लादेश आणि श्रीलंकाविरुद्ध शतके ठोकली होती. त्यांनतर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरुवातीला आणि 2019 च्या अखेरीस वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी शंभरी धावसंख्या पार केली होती.

3. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशकांचा वर्ल्ड रेकॉर्ड देखील रोहितच्या नावावर आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध दोन असे एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 द्विशतकी खेळी केली आहे. इतकंच नाही तर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम देखील रोहितने नोंदवला आहे. रोहितने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 264 धावांची खेळी केली होती.

4. टी-20 क्रिकेटमध्ये रोहित अधिराज्य आहे. टी-20 क्रिकेटमध्ये रोहितने आजवर सर्वाधिक 4 टी-20 शतके केली आहे ज्यामध्ये संयुक्तपणे सर्वात वेगवान शतकाचा देखील समावेश आहे. रोहितने श्रीलंकेविरुद्ध इंदोर सामन्यात 2017 मध्ये 35 चेंडूत सर्वात वेगवान टी-20 शतक ठोकले होते. रोहित व दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर या प्रकरणात संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत.

5. रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा खरा सिक्सर किंग आहे. रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जितके सिक्स खेचले आहे त्याच्या जवळ सध्याच्या भारतीय संघातील कोणताही फलंदाज पोहचू शकलेला नाही. रोहितने 111 टी-20 सामन्यात एकूण 133 षटकार मारले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.