Video | लॉकडाऊन असून विनाकारण रस्त्यावर, पोलिसांनी घडवली अशी अद्दल की व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हरियाणामध्ये नियम मोडणाऱ्या काही लोकांना तर थेट रस्त्यावरच उठबशा काढायला लवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या या शिक्षेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

0 20

अंबाला : देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता देशात वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळे प्रतिबंधात्मक नियम लागू केले आहे. महाराष्ट्रासह अने राज्यामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. मात्र, लॉकाडाऊन लागू केलेला असूनसुद्धा अनेक नागरिकांकडून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर पोलीससुद्धा नियम मोडणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवताना दिसत आहेत. हरियाणामध्ये नियम मोडणाऱ्या काही लोकांना तर थेट रस्त्यावरच उठबशा काढायला लावण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या या शिक्षेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. (Haryana police sit ups punishment video goes viral on social media)

लॉकडाऊन असूनही लोक विणाकारण रस्त्यावर

मिळालेल्या माहितीनुसार सध्या हरियाणामध्ये 10 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे येथे लोकांनी बाहेर पडल्यानंतर पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. यामध्ये पोलीस काही नागरिकांना समजाऊन सांगत आहेत तर काही लोकांवर कडक कारवाई करत आहेत. मात्र हरियाणातील अंबाला येथील काही नागरिक लॉकाडाऊन असूनसुद्धा चक्का रस्त्यावर फिरत असल्यामुळे पोलिसांनी या नागरिकांना जबर शिक्षा दिली आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ हरियाणा येथील अंबाला येथील आहे. येथे काही नागरिक रस्त्यावर फिरत असल्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखलं आहे. त्यांना बाहेर पडण्याचं कारण विचरल्यानंतर समाधानकारक उत्तरं देता न आल्यामुळे पुन्हा विनाकारण घराबाहेर पडू नये म्हणून पोलिसांनी या नागरिकांना चक्क उठबशा काढायला लावल्या आहेत. व्हिडीओमध्ये हे नागरिक एका रांगेत उभे असल्याचे दिसत आहेत. त्यांच्या समोर एक पोलीस दिसतो आहे. हा पोलिस नागरिकांना चक्क उठबशा काढा असे सांगत आहे.

पाहा व्हिडीओ :

 

सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया :

दरम्यान हा व्हिडीओ पाहून अनेकांना मजेदार कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी नियम मोडणाऱ्यांना अशीच अद्दल घडवली पाहिजे असे म्हटले आहे. तर अनेकांनी कोरोना नियम पाळणे बंधनकारक असून ते पाळलेच पाहिजेत अशी भावना व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.