प्रेमासाठी नव्हे, गिफ्टस्साठी त्याने बनवल्या ३५ मैत्रिणी

जपानमध्ये प्रियकर गेला तुरुंगात

0 26

नवी दिल्ली : एकाच व्यक्तीला दोन किंवा तीन मैत्रिणी (गर्ल फ्रेंड्स) असल्याच्या घटना घडल्या आहेत. जपानमध्ये मात्र एकाच वेळी ३५ मैत्रिणी असलेल्या ताकाशी मियागावा (३९) याला त्याने त्यांना लग्नाचे आश्वासन देऊन फसविल्याच्या आरोपावरून तुरुगात जावे लागले आहे.

‘न्यू यॉर्क पोस्ट’च्या वृत्तानुसार मियागावा याने त्याच्या जन्माची .तारीख वेगवेगळी सांगितली होती. ताकाशी मियागावा याला त्याच्या पहिल्या मैत्रिणीने भेटवस्तू दिल्या होत्या. त्यानंतर त्याला भेटवस्तूंचा नादच लागला आणि त्या मिळण्यासाठी त्याने नवनव्या मैत्रिणी बनविणे सुरू केले.

काहीच दिवसांत ती संख्या ३५ झाली. त्याने  एकाही मैत्रिणीला सोडून दिले नाही. तो सगळ्यांना एकाचवेळी डेट करायचा. ताकाशी मियागावा हा घरोघर जाऊन वस्तू विकतो. तो या सगळ्या महिलांना एका मार्केटिंग कंपनीच्या माध्यमातून भेटला होता. त्याने अनेक वस्तू विकल्या. त्यात त्याला चांगला नफा झाला. त्यामुळे त्याची दुसरी योजना सुरू झाली. त्याने या सगळ्या महिलांना एकेक करून मैत्रिणी बनवायला सुरुवात केली. तो त्यांच्याकडून भेटवस्तू मिळवायचा.

Leave A Reply

Your email address will not be published.