सुलतानपूर येथील आरोग्य केंद्र 100 डोस उपलब्ध

0 44

सुलतानपूर येथील आरोग्य केंद्र 100 डोस उपलब्ध झाले असून आज त्या ठिकाणी लस घेणाऱ्यांनी एकच गर्दी झाली असून,त्या ठिकाणी नागरिक सकाळी सात वाजेपासून लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येऊन बसले .

आरोग्य कर्मचारी आल्यानंतर आधार कार्ड जमा करून घेतले.त्यांनी 100 डोस असताना जवळपास 150 कार्ड जमा केले.त्यामधील जे 45 वर्षा अतील होते त्यांचे आधार कार्ड वापस दिले.आधार कार्ड ज्यावेळेस घेतले त्यावेळी नागरिकांना नंबर सांगितले पण जे नंबर सांगितले त्या नंबर नुसार न घेता त्या मधील 45 वर्षांवरील पात्र नागरिकांना व दुसरा डोस असलेल्या नागरिकांना वगळण्यात आले.

त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस असलेल्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे.जेणेकरून त्यांना दुसरा डोस घेण्यास उशीर होऊ नये व त्यांना डोस घेण्यास उशीर झाल्यास त्याला जिम्मेदार कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे.त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देयाला पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.