आरोग्य विभागातील कर्मचारी देत आहेत रात्रनदिवस करोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सेवा

0 8

शेगांव :
करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोना संसर्गाची बाधा झालेल्या रूग्णाना सेवा देण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी रात्रनदिवस स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा देत असल्यामुळे ते देवदुतच ठरलेले आहे.
कोरोना संसर्ग म्हटलं कि कोणीच कोरोना बाधीत व्यक्तीच्या जवळपास सुद्धा फिरकण्याची हिंमत करत नाही परंतू आरोग्य विभागातील कर्मचारी हे सातत्याने शासनस्तरावर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेची,लसीकरणाची अंमलबजावणी करत आहेत.
कोरोना संसर्गाची बाधा होऊ नये म्हणून जि.प. प्राथमिक शाळा खेर्डा येथे कोव्हिशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरणाचे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगावच्यावतीने वैद्यकीय अधिकारी डाॅ.डी.पी.कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२४ एप्रिल २०२१ रोजी खेर्डा आयोजित करण्यात आलेला होता. सदर लसीकरण शिबिराप्रसंगी फ्रण्ट लाईन वर्कर ४, वयोगट ४५ वर्षापेक्षा जास्त वयाचे ५७ व ६० वर्ष वयापेक्षा जास्त २८ असे एकूण ९० ग्रामस्थांना कोव्हिशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात आले आहे.
याप्रसंगी डॉ. लखोटीयामॅडम यांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य सेविका यु.जे.मुंडे यांनी लसीकरणाचे कार्य यशस्वीपणे केले आहे, तुषार भांडे,सरोदे, दिप्ते,आर.पी. निखाडे
यांनी लसीकरण नोंदणी करण्याचे कार्य तर श्रीमती ढोके यांनी लस घेतलेल्या लाभार्थ्यांचे निरीक्षण केले
आहे,
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आर.आर. कडू, सरपंच भास्कर दळी,ग्रामसेवक खरात,तलाठी चौधरी,पोलीस पाटील गीताबाई भारसाकडे,ग्रामपंचायत सदस्या रेखा निंबाळकर,पद्मा गावंडे,आशा सेविका संगीता शिंदे,अंगणवाडी-सेविका पी. डी. चिमनकर,रुख्मिनी वाघमारे यांनी सदर लसीकरण शिबिरामध्ये सहकार्य करून लसीकरणाची जनजागृती करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले आहे.

लसीकरण प्रसंगी उपस्थित आरोग्य विभागातील कर्मचारी,लसीकरण संदर्भात जनजागृती व सहकार्य करणारे गावातील लोकप्रतिनिधी व शासकीय कर्मचारी

लसीकरण ऑनलाईन नोंदणी करतांना आरोग्य विभागातील कर्मचारी व मुख्याध्यापक आर.आर.कडू

Leave A Reply

Your email address will not be published.