भारतीयांच्या हृदयाचा आकार 20 टक्क्यांनी लहान; संशोधनात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शंतनू सेनगुप्ता डॉक्टरांचा दावा!

0 12

नागपूर : भारतीय नागरिकांचे हृदय पाश्चिमात्य नागरिकांच्या तुलनेत 15 ते 20 टक्क्यांनी लहान आहे. त्यामुळे भारतीयांच्या हृदयावरील उपचार पद्धतीत बदल करणे अपेक्षित असल्याचा दावा देशातील काही डॉक्टरांनी केला. याविषयीचे संशोधन अमेरिकेतील ‘द इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डीओव्हॅस्कूलार इमेजिंग’ या नियतकालीकात प्रकाशित झाले आहे. नागपूरचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शंतनू सेनगुप्ता यांचादेखील या संशोधनात समावेश आहे. प्रकाशित संशोधनानुसार, भारत देशातील नागरिकांच्या हृदयांचा आकार पाश्चिमात्य देशातील नागरिकांच्या तुलनेत पंधरा ते वीस टक्क्यांनी लहान आहे. या संशोधनाविषयी बोलताना डॉ. शंतनू सेनगुप्ता म्हणाले, “भारतीयांचे हृदय विदेशी नागरिकांच्या तुलनेत 15 ते 20 टक्क्यांनी लहान आहे. या विषयी अजून अभ्यास होणे बाकी आहे. पण भारतीयांचे हृदय लहान असल्यामुळे हृदयावरील उपचार पद्धतीत बदल करणे अपेक्षित आहे.”

तसेच, भारतीय नागरिकांची शरीरयष्टी लक्षात घेता हृदयाचा आकार लहान असल्याने कोणतेही कॉम्पलिकेशन नसल्याचं ते म्हणाले. धूम्रपान करणारे रुग्ण, मधुमेहाचा आजार असणारे आणि हृदयाचा आजार असणाऱ्या रुग्णांचे हृदय सामान्यतः मोठे आढळून येतात.असा निष्कर्षदेखील डॉ. शंतनू सेनगुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढला आहे.

नागपूर येथील डॉ. शंतनू सेनगुप्ता यांच्यासह देशातील काही नामवंत हृदयरोग तज्ज्ञांच्या टीमने हे संशोधन केले आहे. अमेरिकेतील ‘द इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओव्हॅस्कुलर इमेजिंग’मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. यासाठी भारतातील 6 केंद्रांत हजारो भारतीयांच्या हृदयाची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये 400 रुग्ण हे नागपुरातील आहेत. या सर्वांच्या हृदयाचा आकार 15 ते 20 टक्क्यांनी लहान असल्याचं संशोधनातून पुढे आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.