जोरदार पावसाने नाल्याला पूर, काही नागरिक फसले आणि काढली त्याच ठिकाणी रात्र

0 9

अकोला : राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. (Monsoon active in Maharashtra) कोसळणाऱ्या पावसाने आपला इंगा दाखविण्यास सुरुवात केली आहे. विदर्भातील अकोल्यात काल सायंकाळपासून झालेल्या जोरदार पावसाने शहरातील न्यू तापडियानगर येथील क्रांती चौक परिसरातील नाल्याला मोठा पूर आला. (Heavy rains flooded the nallah In Akola) या जोरदार पावसामुळे नाल्याचा काही भाग वाहून गेल्याने दुसऱ्या बाजूला असलेले नागरिक त्यामध्ये फसले होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांची मदत घ्यावी लागली.

अकोला येथे जोरदार पाऊस कोसळत आहे. संततधार पावसामुळे नाल्याला पूर आला. पाण्याचा अंदाज आला नसल्याने येथील नागरिक नाल्यावरील पुराचा प्रभाव कमी होईल या आशेने थांबले होते. मात्र पाण्याचा वेग रात्रभर कमी झाला नाही. शेवटी सकाळी या नागरिकांना नगरसेवक आणि माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या मदतीने अग्निशामक दलाच्या जवानांनी दोर बांधून त्यांना सुखरूप दुसऱ्या ठिकाणी रेस्क्यु करून बाहेर काढले.

नाल्याचा पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने आसपासच्या काही प्लॉटमध्ये पुराचे पाणी घुसल्याने सगळा भाग जलमय झाला होता. नाल्यांमध्ये जलकुंभी असल्यामुळे ते पाणी जायला वेळ लागला आणि नाल्याला मोठा पूर आला. यामुळे काही नागरिक रात्री त्याठिकाणी फसले होते. शेवटी त्यांना सकाळी सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.