Honey Trap | विधवा शिक्षिका त्याला Video Call करायची, नंतर तिच्या मागणीपुढे गडी असा फसला…

मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात Honey Trap होत आहेत असं नाही. मोठ्या शहरांमध्ये Video Call करुन करुन

0 7

मयुर निकम, झी २४ तास, मुंबई : मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात Honey Trap होत आहेत असं नाही. मोठ्या शहरांमध्ये  Video Call करुन  करुन  Honey Trap करतात, Video Viral करण्याची धमकी दिली जाते, या प्रकरणांमध्ये या महिला दिल्ली किंवा उत्तर भारतातील शहरांमधील असल्याचं दिसून आलं आहे. अखेर Honey Trap म्हणजे तुमची फसणूक, ही फसवणूक झाल्यानंतर होण्याची भीती मनात न ठेवता, पोलीस स्टेशन गाठा, आणि सत्य काय आहे ते सांगा, पण कुणालाही पैसे देण्यास बळी पडू नका.  Honey Trap शेवटी शेवटी एवढ्या पैशांची मागणी केली जाते की, ती तुम्ही पूर्ण करु शकत नाहीत. तेव्हा अनेक जण आत्महत्या या पर्याय स्वीकारतात. या पर्याय अतिशय चुकीचा आहे. यामुळे तुमच्या परिवारातील लोकांना आयुष्यभर याची शिक्षा भोगावी लागते.

चिंतेची बाब आता अशी आहे की, बुलढाणासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच ग्रामीण भागातही  Honey Trap सारख्या घटना घडत आहेत. असाच एक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या पहुरजीरा या गावात घडलाय. honey trap in Buldhana

Video Call​ आणि ऑनलाइन चॅटिंग
सुटाळा या गावात आपल्या दोन मुलींसह राहत असलेल्या एका विधवा शिक्षिकेने प्रभुदास बोळे यांच्यासोबत ओळख केली. यानंतर त्याला व्हिडिओ कॉल आणि ऑनलाइन चॅटिंग या विधवा शिक्षिकेने सुरु केली, ती प्रभुदास यांच्या घरी देखील येत होती.

पण काही दिवसानंतर या शिक्षिकेने बोळे यांना फ्लॅट घेण्यासाठी पैशाची मागणी सुरू केली. त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली , त्यामुळे प्रभुदास वैतागून गेले होते, असे त्याच्या पत्नीने तक्रारीत नमूद केले आहे. 

पैशांसाठी ब्लॅकमेलिंग
तर ही शिक्षिका पैशासाठी मला ब्लॅकमेल करत असल्याने आपण आत्महत्या करीत आहोत , असा मॅसेज आत्महत्येपूर्वी बोळे यांनी आपल्याला पाठवला असल्याचेही तक्रारीत सांगण्यात आले आहे. पोलीस तपासात देखील शिक्षिका पैशासाठी तगादा लावत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत या शिक्षिकेला अटक केली आहे.

वर्षभराच्या आत ही दुसरी घटना 

बुलढाणा जिल्ह्यात वर्षभराच्या आत ही दुसरी घटना घडली आहे. पहिल्या घटनेत हनी ट्रॅपमागे आख्खी गँग असल्याचं समोर आलं होतं. तेव्हा देखील मैत्री करुन व्हीडिओ काढून, व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी एका महिलेने दिली होती.

माझ्या मैत्रिणीला ब्युटी पार्लर काढायचे आहे. यासाठी २५ लाख रुपये दे अशी या महिलेची मागणी होती, असा आरोप तक्रारीत होता. या प्रकरणी महिलेसह २ तरुणांना अटक करण्यात आली होती. ही दुसरी घटना देऊळगाव राजा येथील होती.

Leave A Reply

Your email address will not be published.