पावसामुळे कोसळली घराची भिंत; ७ मुले ढिगाऱ्याखाली दबली, दोघांचा मृत्यू
७ मुले ढिगाऱ्याखाली दबली, दोघांचा मृत्यू
अलीगढ : बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत पावसामुळे कोसळल्याने सात मुले ढिगाऱ्याखाली दबली गेली. यात दोन मुलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. सध्या सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
ही घटना उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील हुसेनपूर शहजादपूर परिसरात शनिवारी (ता. ३०) दुपारी घडली.