शेगांव तालुक्यातील लासुरा येथे १२० ग्रामस्थांना करण्यात आले कोव्हॅक्सिन लसीचे लसीकरण

ग्रामीण भागामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण उत्स्फूर्तपणे सुरू

0 67

शेगांव :
जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये कोरोना संसर्ग प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीचे लसीकरण वैद्यकीय अधिकारी डाॅ.डी.पी.कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२० एप्रिल रोजी संपन्न झाले.

या शिबिरामध्ये फ्रंन्ट लाईन वर्कर ४ लाभार्थी , वय वर्षे ४५ वयोगटापेक्षा जास्त वयोगटातील ५३ लाभार्थी व ६० वर्ष वयोगटापेक्षा जास्त ६३ लाभार्थी असे एकूण १२० लाभार्थ्याना लसीकरण करण्यात आले आहे.

ग्रामस्थांना लसीकरण करतांना आरोग्य विभागातील आरोग्य सेविका

 

या लसीकरण शिबिराप्रसंगी डाॅ.लखोटिया मॅडम,(एएनएम) मुंडे,मनिषा ढोके,दिपते,सरोदे,तुषार भांडे,सरपंच आवारे,मुख्याध्यापक संजय शेगोकार,विजय सपकाळ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग जंवजाळ,आशा सेविका वंदना जवंजाळ,सविता मुकुंदे,तलाठी मोहोड,ग्रामसेविका जवंजाळ,ग्रामपंचायत शिपाई डिंगाबर जवंजाळ,पोलिस पाटील जय जीवन जवंजाळ व ढोले हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.