कठोरा येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत पहिल्या टप्प्यात शंभर जणांनी घेतली लस

आरोग्य विभागातील कर्मचा-यांची यशस्वी कामगिरी

0 0

शेगांव :
कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर शासनाने सुरू केलेल्या कोविड प्रतिबंधात्मक कोव्हिशिल्ड लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे संपन्न झाला असुन ४५ वयापेक्षा जास्त वयोगटातील शंभर जणांना प्रथम डोसीच्या लसीचे लसीकरण करण्यात आले आहे.
या लसीकरण शिबिराकरिता डाॅ.एल.डब्ल्यू.राठोड, आरोग्य सेविका अंजली सोनार,आर.पी.निखाडे,एस.आर.भोंबळे,आशा वर्कर लताताई कठोरकार,सरपंच सुषमाताई खवले,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक पी.आर.खंडारे,रविंद्रभाऊ खवले,ग्रामपंचायत कर्मचारी संतोष खवले,अंगणवाडी सेविका कोकिळाताई खवले,उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट,शिक्षक सुरेश डोसे,सचिन वडाळ सचिन गावंडे यांनी अथक परिश्रम घेऊन लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडली आहे.

कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीकरण करतांना आरोग्य सेविका अंजली सोनार

डाॅ.एल.डब्ल्यू. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण नोंदणी करतांना आरोग्य सेवक आर.पी.निखाडे,एस.आर.भोंबळे

Leave A Reply

Your email address will not be published.