गजराजांना वाचवण्यासाठी आता ‘आय सपोर्ट हत्ती कॅम्प’ मोहीम

हत्ती कॅम्पमधील हत्तींना गुजरातमधील रिलायन्स ग्रुपच्या प्राणिसंग्रहालयात जाण्यापासून वाचविण्यासाठी बहुतांश सर्वच पक्षांचे पदाधिकारी सरसावले आहेत.

0

गडचिरोली : कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये गेल्या अर्धशतकापासून असलेल्या हत्ती कॅम्पमधील हत्तींना गुजरातमधील रिलायन्स ग्रुपच्या प्राणिसंग्रहालयात जाण्यापासून वाचविण्यासाठी बहुतांश सर्वच पक्षांचे पदाधिकारी सरसावले आहेत.

ही माहिती सर्वांसमोर आणल्यानंतर, हत्ती हलविण्यास विरोध सुरू झाला. आता ‘आय सपोर्ट हत्ती कॅम्प’ या नावाने समाजमाध्यमावर मोहीम उघडण्यात आली असून, त्याला सर्व स्तरातून पाठिंबाही मिळत आहे. त्यामुळे हत्तींना येथून हलविण्याचा निर्णय फिरवावा लागण्याची शक्यता निर्माण होत आहे. ही मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.