परीक्षांवर कोरोनाचा परीणाम:ICSE ने 10 वी बोर्डाच्या परीक्षा केल्या रद्द, 12 वीच्या परीक्षांची तारीख नंतर जारी केली जाणार

CBSE च्या 10 च्या परीक्षा देखील रद्द झाल्या आहेत

0 2

कोरोनामुळे काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशंस (CISCE)ने 10 बोर्डाच्या परीक्षा रद्द केली आहे. या परीक्षा 4 मेपासून होणार होत्या. खरेतर 12वीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या नाही, मात्र याचे वेळापत्रक नंतर जारी केले जाणार आहे. CISCE म्हटले आहे की, 12 वीच्या परीक्षा 16 एप्रिलला जारी सर्कुलरनुसार ऑफलाइनच होतील.

CISCE ने म्हटले आहे की, 10 वीच्या परीक्षांचा निकाल देण्यासाठी एक क्रायटेरिया ठरवण्यात येईल. हा क्रायटेरिया काय असेल आणि रिजल्ट कोणत्या तारखेला जारी केला जाईल, या सर्वांविषयी नंतर सांगितले जाईल.

CBSE च्या 10 च्या परीक्षा देखील रद्द झाल्या आहेत
कोरोनामुळे सरकारने गेल्या आठवड्यात CBSE च्या 10 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यासोबतच 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सरकार 1 जूनला 12 वीच्या परीक्षांवर निर्णय घेईल. परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर विद्यार्थ्यांना 15 दिवसांचा वेळ दिला जाईल, म्हणजेच परीक्षा 15 जूननंतर होतील.

देशात सलग तिसऱ्या दिवशी 2.50 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले
सलग तिसऱ्या दिवशी सोमवारी 2.50 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक गोष्ट म्हणजे रविवारच्या तुलनेत यामध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांच्या आत देशात 2 लाख 56 हजार 828 लोक संक्रमित झाले आहेत. रविवारी 1.75 लाखांपेक्षा जास्त लोक पॉजिटिव्ह आढळले होते. पहिल्यांदाच विक्रमी 1 लाख 54 हजार 234 लोकही बरे झाले. यापूर्वी एका दिवसात सर्वात जास्त 18 एप्रिलला 1.43 लाख लोक रिकव्हर झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.