धक्कादायक! कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यास ‘इतक्या’ वेळेत होतो कोरोना

0 7

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
नवी दिल्ली : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवलेला आहे. जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अशातच आता कोरोना बाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.

आधी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३० ते ४० टक्के व्यक्तींनाच कोरोनाची लागण होत होती. पण आता हे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तसेच अगोदर कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर १० मिनिटांनी कोरोना होण्याचा धोका होता. पण आता एका मिनिटातच कोरोनाची लागण होत आहे, असे बीएलके सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयाचे श्वसनतज्ज्ञ डॉ. संजीव नय्यर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत चालली आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल १३ कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.