शंकरपूर येथे अवैध व्यवसायात वाढ पोलीसांच्या मदतीने दारु व्यवसाय जोमात महीला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

0

शंकरपूर :  चिमूर तालुक्यातील शंकरपूर हे संवेदनशिल गाव म्हणून ओळखल्या जात असुन येत्था सहा महिण्यात शंकरपूर व परिसरातील गावात अवैद्य दारु विक्रेत्यांचा महापूर आला असुन इतरही अवैद्य व्यवसाय शंकरपूर पोलीसांचे मदतीने बिनधास्त सुरु आहेत. त्यामुळे गावात व परिसरात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असुन महिला व नगरीकांत मितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून शंकरपूर व परिसरातील अवैद्य व्यवसाय बंद करण्याची मागणी नागरीक करीत आहेत.

दोन वर्षापुर्वी शंकरपूर येथील महिलांनी दारु व्यवसायीकांच्या त्रासामुळे दारुबंदी समितीची स्थापना केली. आणि बऱ्याच दारु विक्रेत्यांना पकडून देवून दारु विक्रेत्यांवर वचक निर्माण केला. त्यामुळे पोलीसांचा महसुल बुडाल्याने या महिलांना पोलीसांनी सहकार्य करणे बंद केले. त्यामुळे महिलांची दारु बंदी समिती मोळकळीस आली. आणि अवैद्य धंदयांपासुन महसुल गोळा करण्याचा पोलीसांचा मार्ग मोकळा झाला.

एक वर्षापुवी शंकरपूर पोलीस चौकीमधे नविन पो. निरीक्षक जांभळे हे रुजू झाले त्यांनी सर्व अवैद्य दारु विक्रेत्यांना पोलीस चौकी येथे बोलावून दारु व्यवसाय पुर्णपणे बंद करण्याचा दम दिला. व दारु विक्रेत्यांवर वचक निर्माण केला, त्यामुळे जांभळे यांचेबाबत महिला व नागरीकांत विश्वास निर्माण झाला. परंतू अवघ्या सहा महिण्यातच जांनळे यांनी नागरीकांचा विश्वासधात केला. त्यानंतर एकसरशी दारु विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली असुन प्रत्येक मोहल्यात शंकरपूर येथे दारु विक्रेते बिनधास्त दारुचा व्यवसाय करीत आहेत.

दारु विक्रेत्यांनी ग्राहकांसाठी बिअर बार प्रमाणे टेबल लावून सर्व सुविधेनी जोरात दारु विक्री सुरु केली. शंकरपूर व परिसरात लगतच्या जिहयातून मोठया प्रमाणात रोज सर्व प्रकारची दारु येत आहे. व याकडे पोलीस जाणिदपुर्दक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे. या व्यवसायामुळे पोलीसांच्या महसुलात जोरदार वाढ झाल्याची चर्चा शंकरपूर व पसिरातील नागरीक करीत आहेत. शंकरपूर व परिसरात या दारु विक्रेत्यांचा महापूर आल्याने गावात मांगन य लेटयांत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.

त्यामुळे महिला व नागरीकांत मितीचे वातावरण निर्माण झालेअसुन गावातील शांतता व सुव्यवस्था मोक्यात आली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकान्यांनी याकडेगांभीर्याने लक्ष देवून शंकरपूर व परिसरातील अवैद्य व्यवसाय बंद करावेत, अशी मागणी शंकरपूर वपरिसरातील नागरीक करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.