शिक्षकांनी औषधोपचारसाठी खर्च केलेल्या वैद्यकीय देयकाची रक्कम तात्काळ अदा करा- महेंद्र रोठे शिक्षक सेना बुलडाणा

वैद्यकीय देयकाची रक्कम मिळण्याची बहुतांश तालुक्यातील शिक्षकांना प्रतिक्षा

0 1

संग्रामपुर :
संग्रामपुरसह इतर बहुतांश पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांनी स्वतःच्या आजारपणासाठी व त्याच्या कुटुंबियांच्या वैद्यकीय शस्त्रक्रिया,वैद्यकीय उपचार व औषधोपचारासाठी खर्च केलेल्या रक्कमेची देयके गत एक महिन्यापासुन जिल्हा परिषद कार्यालयाच्यावतीने मंजुर करण्यात आलेली आहेत,सदर वैद्यकीय देयके परिपुर्ततेच्या रक्कमेची तरतुद सुध्दा जिल्हा परिषदेकडून जिल्हयातील सर्व पंचायत समिती कार्यालयाला गत एक महिन्यापुर्वी वितरित करण्यात आलेली आहे.

जिल्हयातील जवळपास पाचशे ते सहाशे शिक्षकांना प्रलंबित असलेल्या वैद्यकीय देयकाची रक्कम मिळण्याची प्रतिक्षा लागलेली असुन अद्यापपर्यंत वैद्यकीय उपचारासाठी,औषधोपचारासाठी गत एक वर्षापुर्वी शिक्षकांनी खर्च केलेली रक्कम शिक्षकांना अद्यापपर्यंत अदा करण्यात आलेली नाही.

राज्यामध्ये कोरोना संसर्ग परिस्थिती उद्भवल्यामुळे गत एका वर्षापासुन राज्य शासनाकडून फक्त वेतन तरतुदी व्यतिरिक्त अन्य कोणतीही तरतुद प्राप्त नसल्यामुळे सदर कालावधीतील बहुतांश शिक्षकांची वैद्यकीय देयके मंजुर करण्यात आलेली आहेत परंतू वैद्यकीय देयकाची तरतुद प्राप्त नसल्यामुळे सदर देयके वर्षभरापासुन प्रलंबीत होती.

माहे मार्च महिण्यामधे राज्य शासनाकडून शिक्षकांची वैद्यकीय देयके व इतर थकीत देयकाची रक्कम अदा करण्यासाठी जिल्हास्तरावरून सर्व पंचायत समितीकडे आर्थिक तरतूद वितरित करण्यात आलेली आहे.

माहे एप्रिलमध्ये वैद्यकीय देयकाची तरतुद जिल्हयातील सर्व गटविकास अधिकारी यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली असुन,सदर वैद्यकीय देयकाची रक्कम जमा होऊन एक महिण्याचा कालावधी उलटून गेलेला आहे,तरी अद्यापपर्यंत संग्रामपूरसह बहुतांश तालुक्यातील शिक्षकांना वैद्यकीय देयकाची रक्कम व इतर थकीत देयकाची रक्कम अदा करण्यात आलेली नाही.

सदर प्रलंबित वैद्यकीय देयकाची रक्कम शिक्षकांना अदा करण्यासंदर्भात विलंब न करता तात्काळ अदा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी.

शासनाकडुन वैद्यकीय देयकाची तरतुद प्राप्त होऊनही तालुकास्तरावर सदर देयकाची रक्कम अदा करण्यासंदर्भात विनाकारण दप्तर दिरंगाई करण्यात येत असेल तर शिक्षक सेना ते कदापीही सहन करणार नाही.सदर वैद्यकीय देयकाची रक्कम विनाविलंब दोन दिवसाच्या आत शिक्षकांना तात्काळ अदा करण्यात आली नाही तर वरिष्ठांकडे गाभिर्याने रितसर तक्रार नोंदविण्यात येणार आहे अशी मागणी शिक्षक सेनेच्यावतीने करण्यात आलेली आहे.

शिक्षकांनी औषधोपचार व शस्त्रक्रियेसाठी खर्च केलेली वैद्यकीय देयकाची रक्कम तालुकास्तरावर प्रलंबित न ठेवता शिक्षकांना तात्काळ अदा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी अन्यथा शिक्षक सेनेच्यावतीने वरिष्ठ कार्यालयाकडे रितसर तक्रार नोंदविण्यात येणार आहे.

– महेंद्र रोठे
म.रा.शिक्षक सेना बुलडाणा

Leave A Reply

Your email address will not be published.