भर पावसात चुकला चालकाचा अंदाज, गाडी सरळ कोसळली नाल्यात

या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील पळसखेड मार्गावर घडली.

0 7

हायलाइट्स:

  • भर पावसात चुकला चालकाचा अंदाज
  • गाडी सरळ कोसळली नाल्यात
  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

अमरावती : राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे रस्ते अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. असाच एक प्रकार अमरावतीमध्येही घडला आहे. अमरावतीच्या चांदुर रेल्वे परिसरात पडलेल्या पावसामुळे नाल्याच्या पुलावरील पाणी वाढलं आणि चालकाचा अंदाज चुकल्याने गाडी सरळ नाल्यात कोसळली.

या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील पळसखेड मार्गावर घडली. अमरावतीचे बिसमोरे परिवारातील 6 जण कामानिमित्त पळसखेड येथे जात होते. मात्र, या दरम्यान पावसामुळे नाल्याच्या पाण्याच्या वाढ झाली. त्यामुळे चालकाचा अंदाज चुकला व गाडी सरळ नाल्यात कोसळली.

यामध्ये टवेरातील चालकासह अमरावती येथील बिसमोरे कुटूंबातील ६ लोकांचे प्राण वाचले आहे. नाल्याजवळ असलेल्या ओम साई पाईप प्रॉडक्शन कंपनीतील कर्मचाऱ्यांनी गाडीतील नागरिकांचे प्राण वाचविले व गाडीही बाहेर काढली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.