अरे व्वा! एका गोलंदाजाने बाद केलं संपूर्ण संघाला, एकाच सामन्यात मिळवले 10 विकेट्स, 7 जण तर शून्यावर बाद

या गोलंदाजाने सामन्यात एकूण 10.1 ओव्हर गोलंदाजी केली. ज्यात त्याने केवळ 13 रन देत तब्बल 10 विकेट्स घेतले. त्याने 4 ओव्हर मेडन देखील टाकल्या

0 41

लंडन : क्रिकेट (Cricket) असो किंवा कोणताही खेळ बाजी पलटायला काही मिनिटं पुरेशी असतात. कोणत्याच खेळात कधी काय होईल? याचा अंदाज बांधला जाऊ शकत नाही. तिकडे एका हॅरीने म्हणजेच इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरी केनने (Harry Kane) यूरो चषक 2020 (Euro 2020) च्या उपांत्यापूर्व फेरीत युक्रेनला नमवत सेमीफायनलमध्ये संघाला पोहोचवलं. तर दुसरीकडे हॅरी विलियम्स (Harry Williams) या इंग्लंडच्या क्रिकेटपटूने एका सामन्यात 10 विकेट (10 Wicket) पटकावत संघाला एक दमदार विजय मिळवून दिला. ही गोष्ट आहे इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या थेम्स वॅली क्रिकेट लीग (Thames Valley Cricket League) मधील. जिथे क्यू क्रिकेट क्लब (Kew Cricket Club) आणि मार्लो क्रिकेट क्लब (Marlow Cricket Club) यांच्यातील सामन्यात हॅरी विलयम्ल नावाच्या गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली आहे. (In Thames Valley Cricket league Marlo Cricket Club bowler Harry Williams took all 10 Wickets against kew Cricket Club)

सामन्यात मार्लो क्रिकेट क्लबने क्यू क्रिकेट क्लबला 9 विकेट्सने मात दिली. या विजयात सिंहाचा वाटा होता मार्लो संघाच्या गोलंदाज हॅरी विलियम्सचा. ज्याने एकहाी संपूर्ण गोलंदाजीची धुरा सांभाळत प्रतिस्पर्धी संघाला ऑलआऊट केलं. त्याच्या बोल्सवर क्यू क्रिकेट क्लबच्या एकाही फलंदाजाचा टिकाव लागला नाही. ज्यामुळे संपर्ण संघ 20.1 ओव्हर खेळून 54 धावांवर सर्वबाद झाला.

10.1 ओव्हर, 13 रन, 4 मेडन, 10 विकेट = हॅरी विलियम्स

हॅरी विलियम्सने सामन्यात एकूण 10.1 ओव्हर गोलंदाजी केली. ज्यात त्याने केवळ 13 रन देत तब्बल 10 विकेट्स घेतले. त्याने 4 ओव्हर मेडन देखील टाकल्या.  सामन्यात त्याची इकॉनमी 1.28 एवढी होती. विशेष म्हणजे हॅरीने सात फलंदाजाना शून्यावर बाद केलं. केवळ एका फलंदाजाना दुहेरी संख्या गाठता आली त्याने 28 धावा केल्या.

9 विकेट्सने दणकेबाज विजय

हॅरीच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे मार्लो क्रिकेट क्लबला अत्यंत छोटे टार्गेट मिळाले. त्यांना केवळ 58 धावांचे लक्ष्य मिळाले. जे त्यांनी 17 ओव्हरमध्ये केवळ एक विकेटच्या बदल्या पूर्ण केले आणि 9 विकेट्सने विजय मिळवला, अशाप्रकारे हॅरी विलियम्सच्या जादूई गोलंदाजीमुळे मार्लो क्रिकेट क्लबने दमदार विजय आपल्या नावे केला.

Leave A Reply

Your email address will not be published.