जिल्ह्यात कोरोना 491 बाधीत, सात जणांचा मृत्यू

जिल्ह्यातील कोरोना अहवालानुसार एकूण 5943 अहवाल प्राप्त झाले आहेत.

0 22

बुलडाणा,
जिल्ह्यातील कोरोना अहवालानुसार एकूण 5943 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 5452 अहवाल कोरोना नकारात्मक असून 491 अहवाल बाधीत प्राप्त आले आहे. बाधीत अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 352 व रॅपीड टेस्टमधील 139 अहवालांचा समावेश आहे. नकारात्मक अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1167 तर रॅपिड टेस्टमधील 4285 अहवालांचा समावेश आहे. 5452 अहवाल नकारात्मक आहेत.

उपचारादरम्यान गोपाल नगर खामगांव येथील 37 वर्षीय पुरुष, पिंप्राळा ता. खामगांव येथील 29 वर्षीय पुरूष, आरेगाव ता. मेहकर येथील 63 वर्षीय पुरूष, सातगाव भुसारी ता. चिखली येथील 50 वर्षीय पुरूष, वरद ता. नांदुरा येथील 40 वर्षीय पुरुष, धनगर नगर शेगाव येथील 49 वर्षीय महिला व भादोला ता. बुलडाणा येथील 84 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत 461749 रिपोर्ट नकारात्मक प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 78613 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना नकारात्मक असल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 78613 आहे. आज रोजी 2494 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण नकारात्मक अहवाल 461749 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 83732 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 78613 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 4539 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 580 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.