कोविड १९ लसीकरण केंद्राचे उदघाटन संपन्न

0

शंकरपूर : प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरपूर येथे कोविड १९ लसीकरण केंद्राचे उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विध्यमान गट नेता डॉ.सतीशभाऊ वारजूकर यांचे हस्ते पार पडले या वेळी चिमूर पंचायत समिती उपसभापती रोशनभाऊ ढोक,डॉ. शंभरकर मॅडम, बोरकर सर,कर्मचारी वृंद उपस्थित होते

कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे आपण सर्व हताश झालेले आहोत. अशामध्येच शाषणाने अनेक महिन्याचा प्रतीक्षेनंतर कोरोना व्हायरस आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरण सुरू केलेली आहे दिलेल्या निर्देशानुसार आपण नियमांचे पालन करून सर्वांनी पुढाकार घ्यायच आहे.

समाजामध्ये अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या आहेत त्यांना न घाबरता आपण सर्व मिळून सहकार्याने कोविड १९ प्रतिबंधक लस (कोविशील) घेऊन शासनाला मदत करू या आणि स्वतःला ,कुटुंबाला व देशाला सुरक्षित ठेवूया मी लस घेतली आहे तुम्ही पण लस नक्कीच घ्या आणि कोरोना लढ्याचा विरोधात शामिल व्हा अशी माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती

डॉ.सतिशभाऊ वारजूकर माजी अध्यक्ष तथा विध्यमान गट नेता जिल्हा परिषद चंद्रपूर

Leave A Reply

Your email address will not be published.