चिंतेत वाढ! कोरोना संकट दीर्घकाळ राहणार; WHOच्या प्रमुखांनी दिला इशारा, म्हणाले..

0 0

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी जगाला कोरोना व्हायरसपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. कोरोना व्हायरस दीर्घकाळ जगात राहणार आहे, असे टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी म्हणलं आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली आहे.

टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस म्हणाले की, “मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, टेस्टिंग करणे आणि आयसोलेशनमध्ये राहणे अशा सार्वजनिक आरोग्याच्या उपायांवर पुन्हा जोर दिला जात आहे. लस घेतल्यानंतर बेजबाबदारपणे वागू नये. रोज काळजीपूर्वक वागणे गरजेचं आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केल्यास कोरोनावर मात केली जाऊ शकते, हे जगातील बर्‍याच देशांनी दाखवून दिले आहे.”

तसेच टेड्रोस यांच्या म्हणण्यानुसार, कोविडला रोखण्यात बरेच देश यशस्वी झाले आहेत. त्यामुळे ते देश आनंदोत्सव साजरा करत आहेत, अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. सर्व देशांमध्ये पुन्हा प्रवास आणि व्यापार सुरू व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे. परंतु आता जेव्हा काही देशांमध्ये मृतांचा आकडा वाढत आहे तेव्हा लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

दरम्यान, कोरोनाचं संकट दीर्घकाळ आपल्याबरोबर राहणार आहे. परंतु आपण सकारात्मक राहिलं पाहिजे. असेही यावेळी टेड्रोस यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.