इंदापूर शहरात पोलिसांची मोठी कारवाई; पवार टोळीवर अखेर लावला मोक्का

गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनी पवार टोळीवर (Police action Pawar Gang) मोक्का अंतर्गत कार्यवाही केली आहे. या टोळीतील सर्व गुन्हेगारांना सध्या पोलिसांनी अटक केली आहे.

0 3

पुणे : जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) परिसरात विविध गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत असणाऱ्या पवार टोळीवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. यात पाच अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर एकूण 11 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनी पवार टोळीवर (Police action Pawar Gang) मोक्का अंतर्गत कार्यवाही केली आहे. या टोळीतील सर्व गुन्हेगारांना सध्या पोलिसांनी अटक केली आहे.

खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे (extortion), अवैद्य सावकारी, जबरी चोरी (theft), घरफोडी (house break), मारामारी असे विविध गंभीर गुन्ह्यांमुळे या टोळीची दहशत पसरली होती. इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहुल बाळासाहेब पवार, गणेश बाळासाहेब पवार आणि त्यांचे साथीदार हे जवळपास गेल्या आठ ते दहा वर्षांपासून वेगवेगळे गुन्हे करत आहेत. 2011 पासून त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या टोळीतील पवार बंधूसह महेंद्र धाइजे, विवेक शिंदे, सागर बाबर यांच्यावर आतापर्यंत एकूण 11 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, अवैद्य सावकारी, जबरी चोरी, घरफोडी, मारामारी असे गुन्हे संघटितपणे केले आहेत. यावेळी या टोळीवर कडक कारवाई करण्याचे आदेश ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडून मिळाले होते. त्यानुसार या गुन्हेगारांवर मोका कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर बारामती विभाग हे करत आहेत, अशी माहिती पोलिसांकडून प्रेस नोट काढून देण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार यापुढे गुन्हेगारांवर अशीच कडक कारवाई करण्यात येणार आहे. गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. यापुढे वाळू चोरांवरही अशीच गंभीर कारवाई करण्यात येईल, वाळू चोरांविषयी कडक पाऊल उचलले जाणार असून जवळपास 25 चोरट्यांवर तडीपारसारखी कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे धाबे दणाणले असल्याचे सागंण्यात येत आहे. मात्र, या कारवाईनंतर आता गुन्हेगारीवर नेमका कितपत आळा बसणार हे येत्या काळात समजणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.