विद्यार्थ्यांच्या ५० टक्के उपस्थितीवर शाळा सुरू करा : IESA ची मागणी
जालना : विद्यार्थ्यांच्या ५० टक्के उपस्थितीवर शाळा सुरू ठेवा अशी मागणी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर (arjun khotkar) यांच्यासह इंडिपेंडेट इंग्लिश स्कुल असोसिएशनने (ईसा) (independent english schools association) केली आहे. याबाबतचे निवदेन संघटनेने आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांच्याकडे देण्यात आले आहे. (independent english schools association demands to reopen school in maharashtra with 50 percent attendance norms)
या मागणीवर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं आश्वासन राजेश टोपे (rajesh tope) यांनी ईसा संघटनेला दिलंय. राज्यातील विना स्वयं अर्थसहाय्यीत शाळांमध्ये दहा लाख शिक्षक आणि दाेन लाख कर्मचारी कार्यरत असून शाळा (school) बंद झाल्यामुळे १२ लाख जणांवर उपासमारीची वेळ आलीय. त्यामुळे सर्व नियम पाळून ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरू ठेवाव्यात अशी मागणी ईसा संघटनेने केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याकडे देखील ही मागणी ईसा संघटनेने पाठवली आहे.
दरम्यान रात्रीपासून जालना (jalna) जिल्ह्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरी हे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आलेल्या शिक्षकांनी (teachers) या नियमांचा फज्जा उडवत जमावबंदी आदेशाच उल्लंघन केलं. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातच नियमांचा फज्जा उडाला.