Ind vs Eng : स्मृती मानधनाच्या तुफानी खेळीच्या जोरावर इंग्लंडचा केला पराभव

0

IND W vs ENG W : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना यजमान इंग्लंड संघाने जिंकला होता. तर भारतीय महिला क्रिकेट संघाने मालिकेतील दुसरा सामना जिंकून तीन सामन्यांच्या T20I मालिकेत बरोबरी साधली आहे. या सामन्यात स्मृती मानधनाने तुफानी खेळी खेळली, ज्याच्या जोरावर भारतीय संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 142 धावा केल्या. यजमानांकडून केम्पने 51 धावा केल्या, तर बाउचियरने 34 धावा केल्या. याशिवाय इंग्लिश संघाकडून इतर कोणत्याही फलंदाजाने विशेष कामगिरी करू शकला नाही. भारताकडून स्नेह राणाने 3 तर रेणुका सिंग आणि दीप्ती शर्माने 1-1 विकेट घेतली.

143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र शेफाली वर्मा 20 धावा करून बाद झाली, तोपर्यंत पॉवरप्लेमध्ये संघाच्या 55 धावा केल्या होत्या. भारताची दुसरी विकेट 77 धावांवर पडली. यानंतर सलामीवीर स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यात भागीदारी झाली आणि संघाने 16.4 षटकांत लक्ष्य गाठले.

Leave A Reply

Your email address will not be published.