IND vs PAK Asia Cup 2022 : हार्दिक पांड्याचा जलवा; धोनी स्टाईलने षटकार मारत संपवला सामना

हार्दिक पांड्याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत संपवला सामना

0

भारताने पाकिस्तानचा शेवटच्या षटकात पराभव करत आशिया कपमधील आपला पहिला सामना जिंकला. हार्दिक पांड्याने 3 चेंडूत 6 धावांची गरज असताना षटकार मारून सामना संपवला. हार्दिक पांड्याने 17 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. त्याला जडेजाने 29 चेंडूत 35 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी रचली.

आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. भारताने पाकिस्तानचा डाव 147 धावात संपवला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने 4 तर हार्दिक पांड्याने 3 विकेट घेतल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 43 धावा केल्या.

भारताने पहिल्या षटकापासून टिच्चून मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजांना आपले हात खोलण्याची संधी दिली नाही. विशेष करून हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारने आजच्या सामन्यात शॉर्ट बॉल स्ट्रॅटजी योग्य प्रकारे वापरली.

पहिल्याच षटकात पाकिस्तान आणि भारत यांनी रिव्ह्यू घेतल्याने भुवनेश्वरचे षटक चांगलेच हॅपनिंगवाले राहिले. मात्र पाकिस्तानचा रिव्ह्यू यशस्वी ठरला आणि मोहम्मद रिझवान दुसऱ्याच चेंडूवर बचावला. तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शॉर्ट बॉलने सप्राईज केले. बावचळवलेल्या बाबरला चेंडू कळालाच नाही आणि तो अर्शदीप सिंगकडे झेल देऊन 10 धावांवर परतला.

बाबर आझम बाद झाल्यानंतर सलामीवीर मोहम्मद रिझवानने पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने मधल्या फळीतील फलंदाजांबरोबर भागीदारी रचण्यास सुरूवात केली. मात्र ही भागीदारी तोडण्यात हार्दिकला यश आले. हार्दिक पांड्याने रिझवान आणि इफ्तिकार यांच्यातील तिसऱ्या विकेटसाठीची 45 धावांची भागीदारी संपवली. त्याने इफ्तिकारला बाऊन्सरवर बाद केले. इफ्तिकार अहमदने 22 चेंडूत 28 धावांची खेळी केली. त्यानंतर हार्दिकने मोहम्मद रिझवानला 43 धावांवर बाद करत पाकिस्तानचा सेट झालेला फलंदाज बाद केला.

हार्दिक पांड्याने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात शॉर्ट बॉलचा चांगला मारा करत पाकिस्तानची मधली फळी कापून काढली. त्याने खुशदील शाहला 2 धावांवर बाद केले. हार्दिक पांड्याने आपल्या स्पेलमध्ये सातत्याने 140 किलोमिटर प्रतीतास वेगाने गोलंदाजी केली. हार्दिक पांड्याने 25 धावात 3 तर भुवनेश्वर कुमारने 26 धावात 4 बळी टिपले. तर या दोघांना अर्शदीपने 2 तर आवेश खानने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

भारताने पाकिस्तानचा शेवटच्या षटकात पराभव करत आशिया कपमधील आपला पहिला सामना जिंकला. हार्दिक पांड्याने 3 चेंडूत 6 धावांची गरज असताना षटकार मारून सामना संपवला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.