Indian Idol 12 | इंडियन आयडॉल कार्यक्रम खरंच ‘फेक’? पाहा स्पर्धक अंजली गायकवाड काय म्हणाली…

नुकतीच स्पर्धक अंजली गायकवाड (Anjali Gaikwad) शोमधून आऊट झाली होती, त्यामुळे प्रेक्षक खूप निराश झाले. अंजली बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर या शोबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, अंजली ऐवजी षण्मुखप्रिया शोच्या बाहेर जायला हवे होते.

0 6

मुंबई : : ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) हा शो प्रेक्षकांना खूप आवडतो. पण शोच्या या सिझनला बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागत आहे. शोबद्दल बरेच वाद निर्माण झाले आहेत. नुकतीच स्पर्धक अंजली गायकवाड (Anjali Gaikwad) शोमधून आऊट झाली होती, त्यामुळे प्रेक्षक खूप निराश झाले. अंजली बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर या शोबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, अंजली ऐवजी षण्मुखप्रिया शोच्या बाहेर जायला हवे होते. त्याचवेळी हा शो फेक असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता (Indian Idol 12 contestant Anjali Gaikwad on reaction on shows credibility).

आता अंजलीने शोवरील आरोप आणि इतर वाद यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड लाईफशी बोलताना अंजली म्हणाली, ‘पहिल्या 2-3 महिन्यांत आम्हाला बरेच कौतुक मिळाले, पण जसजसा हा शो पुढे पुढे गेला, तसतसे या शोविषयी बरेच नकारात्मकता निर्माण झाली. लोकांनी यस शोला ट्रोल करण्यास सुरुवात केली आणि सोशल मीडियावर शोबद्दल आणि निर्मात्यांविषयीही नकारात्मक प्रतिक्रिया देऊ लागल्या.’

आम्ही दुर्लक्ष केले!

‘मला नावे घ्यायला आवडत नाहीत, पण काही लोक म्हणाले होते की शोचे निर्माते फक्त एका व्यक्तीलाच प्रसिद्धी देत आहेत बाकीच्यांना नाही. परंतु, आम्ही सगळ्यांनीच या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि या नकारात्मकतेचा सामना केला. आम्ही फक्त आमच्या गाण्यावर लक्ष केंद्रित केले. कारण शेवटी आम्ही आपली कला सिद्ध करण्यासाठी येथे आलो आहोत.’(Indian Idol 12 contestant Anjali Gaikwad on reaction on shows credibility)

सोशल मीडियावरील कमेंट थांबवू शकत नाही

अंजली म्हणाली, ‘आम्ही सोशल मीडियावर लोकांना बोलण्यापासून थांबवू शकत नाही. आम्ही त्यांच्या कमेंटकडे दुर्लक्ष करतो आणि फक्त आमच्या गाण्यांचा विचार करतो. मी हे सर्व केले आणि टॉप 9 मध्ये पोहोचले. माझ्यासाठी ही एक मोठी गोष्ट आहे, कारण मी पहिल्या 9 स्पर्धकांच्या यादीत पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे आणि मी खूप भाग्यवान आहे.

जगभरात शास्त्रीय गायन करायचेय…

अंतिम सोहळ्याच्या काहीच दिवस आधी बाहेर पडल्यानंतर अंजली म्हणाली, ‘मला वाईट वाटले नाही. हे शोचे स्वरूप आहे आणि एखाद्यास शोमधून बाहेर जावेच लागते. माझे वडील मला म्हणाले की, आता अजून शिकायचे आहे, तुझा भविष्यकाळ खूप उज्ज्वल आहे. हा बाहेर पडल्यानंतर थोडेसे वाईट वाटले, परंतु नंतर मी माझा आत्मविश्वास परत वाढवला. मी स्वत:ला सांगितले की, मला आणखी कठोर परिश्रम करावे लागतील आणि शास्त्रीय गायन जगासमोर आणले पाहिजे. मला संपूर्ण भारत आणि देशाच्या बाहेर शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम करायचे आहेत.’

(Indian Idol 12 contestant Anjali Gaikwad on reaction on shows credibility)

 

Leave A Reply

Your email address will not be published.