फुकट लॅपटॅापचा मोह महागात; तरुणाला सव्वा लाखांचा गंडा…!

फुकट लॅपटॅाप मिळवण्याचा मोह एका तरुणाच्या अंगलट आला. पाच हजार रुपयांच्या खरेदीवर ग्राहकांना लॅपटॅाप भेट देण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले होते.

0

पुणे : फुकट लॅपटॅापचा मोह महागात

पुणे : फुकट लॅपटॅाप मिळवण्याचा मोह एका तरुणाच्या अंगलट आला. पाच हजार रुपयांच्या खरेदीवर ग्राहकांना लॅपटॅाप भेट देण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. चोरट्याने तरुणाच्या बँक खात्यातून एक लाख ३४ हजार रुपये लांबविले. याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दयाशंकर मिश्रा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिश्राने तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. एका नामवंत घड्याळ उत्पादक कंपनीकडून ग्राहकांसाठी योजना जाहीर करण्यात आली आहे. पाच हजार रुपयांच्या खरेदीवर लॅपटॅाप भेट देण्यात येणार असल्याची बतावणी मिश्राने केली होती. त्यानंतर मिश्राने तरुणाला ॲपद्वारे पैसे जमा करण्यास सांगितले. तरुणाने पैसे जमा केल्यानंतर मिश्राने बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली. या माहितीचा गैरवापर करुन मिश्राने तरुणाच्या बँक खात्यातून एक लाख ३४ हजार रुपये लांबविले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. फस‌वणूक तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.