कोल्हापुरात राडा:मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी, डॉ. तन्मय व्होरा यांच्या रुग्णालयात कार्यकर्त्यांचे तीव्र आंदोलन

'डॉ. व्होरा यांनी पत्र मागे घेऊन माफी मागावी'

0 5

कोल्हापुरात राडा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला रद्द केल्यामुळे 2013 आणि 2014 मध्ये एमपीएसच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रद्द कराव्या.अशा मागणीचे पत्र सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या राज्यस्तरीय ऑर्गनायझेशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.कोल्हापूर येथील सुर्या हॉस्पिटलचे डॉ.तन्मय व्होरा या ऑर्गनायझेशनचे संचालक आहेत.वेबसाईटवर शोध घेत असताना या आशयाचे पत्र सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या हाती लागले. त्यावरून संतप्त झालेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली.

मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने जाऊन डॉ. व्होरा यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रचंड गोंधळ घातला.जोरदार घोषणाबाजी केली.हॉस्पिटलचा फलक सुद्धा फाडून टाकला. आणि डॉ.व्होरा यांनी हे पत्र मागे घेऊन मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी केली.

काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, सेव्ह मेरिट सेव्ह नेशन नावाची नांदेड येथील नोंदणी कृत संस्था आहे. ही संस्था राज्य स्तरावर काम करते. या संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले. त्या पत्रात 2013 आणि 2014 मध्ये एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरीत घेऊ नये, अशा आशयाचे पत्र दिले आहे. त्या पत्रावर कोल्हापूरच्या डॉ.तन्मय व्होरा यांचा संचालक म्हणून उल्लेख आहे.

सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या मारवाडी समाजाच्या संस्थेने मराठा आरक्षणाच्या विरोधात लढाई लढायला सुरुवात केली आहे. या ऑर्गनायझेशनसाठी डॉ.तन्मय व्होरा याने 20 लाख रुपये देणगी दिल्याचे आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला. डॉ.व्होरा कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत राहून मराठा समाजाच्या विरोधात काम करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही अशी भूमिका घेऊन त्याच्या व्होरा सायकल कंपनी, व्होरा ट्रान्सपोर्ट अशा अन्य व्यवसायावर सुद्धा कोल्हापूरच्या मराठा समाजाने बहिष्कार घालावा असे आवाहन यावेळी सकल मराठा मोर्चाचे सचिन तोडकर यांनी केले.

दिलीप पाटील म्हणाले, मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही हा लढा लढत आहोत,साडेसहा हजार तरुणांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.आणि अशा परावृत्त जर कोल्हापुरात राहून मराठा आरक्षणाच्या विरोधात काम करत असतील तर त्यांना आम्ही यापुढेही सोडणार नाही.

माफी मागून शांत करण्याचा प्रयत्न अपयशी
डॉ.तन्मय व्होराने हॉस्पिटलमधून खाली येऊन सर्व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर सकल मराठा समाजाची माफी मागावी अशी भूमिका घेतल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांच्या प्रयत्नामूळे अखेर डॉ. तन्मय व्होरा यांनी सर्वांसमोर येत आपला या पत्राशी संबंध नाही, मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक होऊन या ठिकाणी आल्यानंतर या पत्राबाबत मला कळाले आहे तरी देखील जर माझ्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो असे सांगून माफी मागितली तरीही 20 लाख रुपये सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ऑर्गनायझेशनला का दिले या प्रश्नावर धारेवर धरत आक्रमक आंदोलकांनी हॉस्पिटलवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना ताब्यात घेतले. यानंतर हॉस्पिटल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.