IPL 2021 : कॅच सुटला, डोळ्याला बॉल लागला, तरी विराट मैदानातच थांबला

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Mumbai Indians vs RCB) यांच्यातल्या सामन्याने सुरूवात झाली आहे.

0 0

चेन्नई, 9 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Mumbai Indians vs RCB) यांच्यातल्या सामन्याने सुरूवात झाली आहे. यावर्षाच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सची बॅटिंग गडगडली आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले बॅटिंगला पाठवल्यानंतर मुंबईला 20 ओव्हरमध्ये 159-9 पर्यंतच मजल मारता आली हर्षल पटेल (Harshal Patel) याने 4 ओव्हरमध्ये 27 रन देऊन 5 विकेट घेतल्या. आयपीएलच्या 14 मोसमांमध्ये मुंबईविरुद्ध 5 विकेट घेणारा हर्षल पटेल हा पहिलाच बॉलर ठरला.

एकीकडे आरसीबीने उल्लेखनीय बॉलिंग केली असली तरी त्यांची फिल्डिंग मात्र निराशाजनक झाली. बँगलोरने फिल्डिंग करत असताना काही सोपे कॅच सोडले. यात कर्णधार विराट कोहलीचाही समावेश होता.

विराट कोहलीने कृणाल पांड्याचा (Krunal Pandya) कॅच सोडला. विराटच्या हातातून बॉल बाहेर पडला आणि थेट डोळ्याला लागला. बॉल लागला तरी विराट मैदानातच राहिला. खराब फिल्डिंगसोबत आरसीबीने या सामन्यात काही नो बॉलही टाकले, पण हर्षल पटेलच्या उत्कृष्ट बॉलिंगमुळे त्यांचं म्हणावं तसं नुकसान झालं नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.