BCCI म्हणतयं ज्याला IPL सोडायची त्यांनी सोडावं, पण हा खेळ असाच चालू राहील

भारतातील कोरोना संकटाने भारतीय प्रिमिअर लीग (IPL 2021) च्या खेळाडूंना चिंतित टाकले आहे. एकामागून एक खेळाडू स्पर्धा सोडून घराचा रस्ता पकडू लागला आहे.

0 25

नवी दिल्ली : भारतातील कोरोना संकटाने भारतीय प्रिमिअर लीग (IPL 2021) च्या खेळाडूंना चिंतित टाकले आहे. एकामागून एक खेळाडू स्पर्धा सोडून घराचा रस्ता पकडू लागला आहे. भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्र अश्विन (Ravichandran Ashwin) सह काही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आयपीएलला रामराम ठोकला आहे. परंतु बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले आहे की, ‘हा खेळ असाच चालू राहील’.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा खेळाडून आर अश्विन (R Ashwin) ने सनरायर्स हैदराबादच्या विरुद्धाचा सामना जिंकल्यानंतर ट्विट केले.‘मी उद्या रात्रीपासून आयपीएलपासून ब्रेक घेत आहे. माझं कुंटूब कोरोनाशी संघर्ष करत आहे. या संकटसमयी त्यांना माझी गरज आहे’. ’जर परिस्थिती ठीक असेल तर मी परत येईल’. धन्यवाद दिल्ली कॅपिटल्स, मिळालेल्या माहितीनुसार अश्विनच्या कुटुंबातील कोणी सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि राजस्थान रॉयल्सचे जलदगतीचे गोलंदाज एंड्रयू टायने भारतात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशात प्रवेश निषेध केल्याने आयपीएलला रामराम ठोकला आहे. यानंतर अशी चर्चा होऊ लागली आहे की, बहुतेक खेळाडू हा निर्णय घेऊ शकतील. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या केन रिचर्डसन आमि एडम जाम्पानेही आपल्या खासगी कारणांमुळे लीग सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एंड्रयू टाय सांगितले की, त्यांना गृहनगर पर्थमध्ये भारतातून जाणाऱ्यांना आयसोलेश करण्यात येणारी प्रकरणे वाढू लागली आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतला. दरम्यान टाय अजून एकही सामना खेळलेला नाही, त्याला एक कोटी रुपये देऊन खरेदी करण्यात  आले होते. टाय ने सोमवारी दोहाच्या सेन रेडिओला सांगितलं की, याची अनेक कारणे आहेत. परंतु मुख्य कारण हे आहे की, पर्थमध्ये भारतात परतणाऱ्या लोकांना हॉटेलमध्ये आयोलेशन करण्याचे प्रकरणे वाढली आहेत. पर्थ सरकार पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये येणाऱ्यांच्या संख्येवर कपात करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी सांगितलं की, देशात प्रवेश नाही मिळणार नाही त्याआधी मी तेथे जाऊ. बबल येते अधिक काळासाठी राहणं हे खूप कठीण आहे. ऑगस्टपासून आतापर्यंत फक्त ११ दिवस मी बबल पासून बाहेर राहिलो आहे, आता घरी जाण्याची इच्छा आहे’.

दरम्यान बीबीसीच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ‘आयपीएल सुरूच राहील. कोणाला सोडून जाण्याची इच्छा असेल, तर काही हरकत नाही‘. तर  आरसीबीने आपल्या एका विधानात म्हटलं आहे की, ‘एडम जाम्पा आणि केन रिचर्डसन हे खासगी कारणांमुळे मायदेशी परतत आहेत आणि ते बाकी सामने खेळणार नाहीत‘. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पुर्णपणे त्यांच्या सोबत आहे, आणि त्यांना प्रत्येक शक्य असलेली मदत करत आहे. बंगळुरूचा फिेरकी गोलंदाज जाम्पाला दीड कोटी आणि रिचर्जसनला चार कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले होते.

दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू संघाने संयुक्तपणे केलेल्या विधानात म्हटलं की, ‘आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडू, प्रशिक्षक, निवेदकांच्या संपर्कात आम्ही आहोत आणि परिस्थितीवर नजर ठेवून आहोत’. इंग्लड आणि वेल्स क्रिकेट बोर्डचा एक प्रवक्ता म्हणाला की, ‘आम्ही आमच्या खेळाडूंच्या संपर्कात आहोत. या संकटसमयी आमच्या संवेदना भारतातील लोकांबरोबर आहेत’.

याच दरम्यान कोलकाता नाइट रायडर्सचे मेंटर डेविड हसी म्हणाले की, आयपीएलमधील काही ऑस्ट्रेलियन खेळाडू चिंतित आहेत कारण,  भारतातील वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे मायदेशी कसे परत जाणार. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर हसी ने सिडनी मार्निग हेरॉल्ड शी बोलताना सांगितले की, प्रत्येक जण थोडा नर्व्हस आहे की ऑस्ट्रेलिया परत कसे जाणार. हसीने सांगितलं की आयपीएलसाटी एक कडक बायो बबल बनवण्यात आले आहे, परंतु भारतातील सध्याची परिस्थिती पाहता खेळाडू चिंतित आहेत.

दरम्यान ब्रिटेन न्युझीलँडसह अनेक देशांनी भारतातील प्रवासावर प्रतिबंध केले आहेत. ऑस्ट्रेलियानेही उड्डाणांमध्ये ३० टक्के कपात केली आहे. दरम्यान केन विलियमसन आणि ट्रेंट बोल्टसह न्युझीलँडच्या खेळाडूंना दोन जूनपासून इंग्लड विरुद्धात होणाऱ्या कसोटी मालिकांसाठी मधीच जावं लागणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना ३० मे ला अहमदाबादेत होणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना परत नेण्यासाठी चार्टर्ड विमान उपलब्ध करुन देऊ शकते. कारण आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचे १४ खेळाडू सहभागी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.