कोरोना लसीबाबत तुम्हाला प्रश्न पडलेत का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

लस घेण्याबाबत अनेकांना प्रश्न पडत आहे तसेच एक डोस कोवॅक्सीनचा तर दुसरा डोस कोविशील्डचा घेतला तर चालेल का? यासारखे अनेक प्रश्न सध्या नागरिकांना सतावत आहे

0 26

मुंबई: देशभरात कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. पहिल्या टप्यात अत्यावश्यक विभागातील कर्मचारी, आरोग्य विभाग तसेच अन्य ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील व्यक्तींना लसीसाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतरचा दुसरा टप्पा हा ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी सुरु करण्यात आला. आता १ मेपासून तिसरा टप्पा सुरू केला जाणार आहे. यात १८ वर्षावरील व्यक्तींना लस दिली जाणार आहे.दरम्यान,लस घेण्याबाबत अनेकांना प्रश्न पडत आहे तसेच एक डोस कोवॅक्सीनचा तर दुसरा डोस कोविशील्डचा घेतला तर चालेल का?

यासारखे अनेक प्रश्न सध्या नागरिकांना सतावत आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे चेन्नई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त(आरोग्य) डॉ. अल्बी डॉन वर्गीस, शहर आरोग्य अधिकारी डॉ. एम जगदीशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी डॉ. प्रदीप कौर आणि डॉ. पी गणेश यांनी सेमिनारमध्ये दिली.

प्रश्न -कोणती लस घ्यावी. कोवॅक्सीन की कोविशील्ड?

दोन्ही लसींची चाचणी घेण्यात आली आहे. दोन्हीही प्रभावी आहेत. जी लस उपलब्ध आहे ती नागरिकांनी घ्यावी.

प्रश्न – एक डोस कोवॅक्सीनचा आणि एक डोस कोविशील्डचा घेतला तर चालेल का?

नाही. दोन्ही डोस हे एकाच लसीचे असावेत.

प्रश्न – हार्ट बायपास रुग्ण लस घेऊ शकतात का?

हो.

प्रश्न – लस घेतल्यानंतर कोरोना होतो का?

आमच्याकडे भारतात लिमिटेड डेटा आहे. मात्र अमेरिकन एजन्सी Centre for Disease Control नुसार लस घेतल्यानंतर  ९९.९९ टक्के बाधा होत नाही.

प्रश्न – ज्या रुग्णांना अलर्जी आहे असे रुग्ण लस घेऊ शकतात का?

डॉक्टरांशी एकदा बोलून घ्यावे. अनेक प्रकारच्या अलर्जी असतात. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची अलर्जी आहे तर रुग्णालयात जा. लस घेतल्यानंतर अलर्जी झाल्यास ते मॅनेज करू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.