एक बालविवाह थांबवताना दुसराही उघड

जामखेड पोलिसांनी दोन बालविवाह रोखले,‘चाइल्ड लाइन’संस्थेचा पुढाकार

0 34

जामखेड पोलिसांनी दोन बालविवाह रोखले,‘चाइल्ड लाइन’संस्थेचा पुढाकार

नगर : बालविवाह होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर स्नेहालय संचालित ‘चाईल्ड लाईन’ संस्थेचे कार्यकर्ते व पोलीस मूळ तक्रार असलेल्या गावाऐवजी भलत्याच गावात पोहोचले. मात्र हा विवाहही अल्पवयीन मुलीचाच असल्याचे उघड  झाले. यासह मूळ तक्रार असलेल्या गावातील बालविवाह थांबवण्यात ‘चाइल्ड लाइन’ व पोलिसांना यश आले. जामखेड तालुक्यातील शेऊर व पाटोदा या गावातील या घटना आहेत.

जामखेड तालुक्यातील शेऊर गावात आज, गुरुवारी सकाळी १० वाजता एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची तक्रार ‘चाईल्ड लाईन’च्या १०८८ या क्रमांकावर प्राप्त झाली होती. संस्थेच्या कार्यकर्त्यांंनी ही माहिती ताबडतोब जामखेड पोलीस ठाण्याला दूरध्वनीद्वारे देण्यात आली. या माहितीमध्ये मुलीचे संपूर्ण नाव किंवा निश्चित स्वरूप माहीत नव्हते. तरीही या अपूर्ण माहितीचा आधार घेऊन जामखेड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी रवाना झाले.

हा बेकायदेशीर बालविवाह सुरू असतानाच रोखण्यात आला. पण चाईल्ड लाईन व पोलिसांकडे मुलीची संपूर्ण माहिती नसल्याने पोलिस पाटोदा गावात पोहोचले होते. हा विवाह चाईल्ड लाईनला तक्रार प्राप्त झालेल्या कुटुंबातील नव्हता. परंतु प्रत्यक्षात अल्पवयीन मुलीचाच विवाह तेथेही होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिस व चाईल्ड लाईन कार्यकर्त्यांंचे पथक तक्रार प्राप्त झालेल्या शिरूर गावात गेले. या दुसऱ्या ठिकाणचा शेऊर  गावातील विवाहही अल्पवयीन मुलीचा होता, तोही थांबवण्यात आला.

या दोन्ही बालविवाह प्रकरणातील वधू-वर आणि त्यांच्या नातेवाइकांना बाल कल्याण समितीपुढे हजर राहण्यासाठी पोलिसांनी वर-वधूच्या पालकांना आणि हे लग्न जमवण्यासाठी, लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याना सुद्धा पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

सरपंच व ग्रामसेवकांवर जबाबदारी

गावपातळीवर बालविवाह थांबवण्यासाठी ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत. जिल्हा बाल संरक्षण कक्षाने  गावात बाल संरक्षण समितीची स्थापना करावयाची आहे. समिती गावातील बाल संरक्षणाचे व बालकांच्या अडचणींच्या निवारणाचे काम करायचे आहे. राज्य सरकारच्या या आदेशानुसार शेऊर व पाटोदा गावातील बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष सरपंच, सदस्य पोलीस पाटील, शिक्षक, सदस्य सचिव म्हणून अंगणवाडी सेविका यांना विवाहस्थळी बोलावून त्यांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देण्यात आली व बालविवाह थांबवण्यासाठी कारवाई करण्यास बजावण्यात आले. तसेच वधू-वर व त्यांच्या नातेवाइकांचीही समजूत काढण्यात आली.

ब्राह्मण, आचारी आणि मांडववाला यांना समज

पुरोहितांशिवाय लग्नाचे विधी पार पडू शकत नाहीत. त्यामुळे या दोन्ही बालविवाह  प्रकरणात ब्राह्मण, आचारी आणि मंडपवाले यांच्याकडून लेखी जबाब घेण्यात आले व त्यांना समज देण्यात आली, की यापुढे जर आणखी कोणताही बालविवाह लावताना आढळले तर बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ नुसार  तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.