गौप्यस्फोट:राज्यपालांनी खासगीत सांगितलेल्या गोष्टी उघड करु शकत नाही, 12 आमदारांच्या नियुक्तीला विलंब ते मुद्दाम करत नाहीत; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

12 आमदारांच्या नियुक्तीला विलंब ते मुद्दाम करत नाहीत; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

0 20

कोल्हापूर : राज्यपालांना पाठवलेल्या 12 विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे. यासंदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपालांना दोष देता येणार नाही असे म्हणत नवीन चर्चा सुरू केली. ‘आतापर्यंत राज्यात अनेकांची सत्ता आली आणि गेली, पण ‘अशी ‘वागणूक कोणत्याच राज्यपालांनी सरकारला दिली नाही. बारा सदस्यांचा प्रस्ताव राज्यपालांच्या हातात दिला आहे. त्यावेळी त्यांनी काही गोष्टी आम्हाला खासगीत सांगितल्या. त्या इथे आम्ही उघड करू शकत नाही. सरकार ज्या शिफारशी करते, त्या राज्यपालांनी मान्यच करायच्या असतात,’ असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापुरात व्यक्त केले.

बारा विधान परिषद सदस्यांच्या विषयावर बोलताना जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, आम्ही स्वतः बारा सदस्यांचा प्रस्ताव राज्यपालांच्या हातात दिला आहे. अनेकदा त्याची आठवण करून दिली आहे. तरीही प्रस्ताव नसल्याचे सांगत असतील तर हे फारच आश्चर्यकारक आहे . राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत. ते मुद्दाम असे करतात असे मी म्हणणार नाही. 12 सदस्यांची पदे बराच काळ रिक्त आहेत, याचं शल्य जनतेला आहे. त्यामुळे रोष वाढत आहे. म्हणून तर प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे असेही ते म्हणाले.

कोरोना व कोकणात येऊन गेलेल्या वादळासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर हे सरकारवर टीका करत आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकारने करोनाचा विषय अतिशय चांगला हाताळला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्रंदिवस कार्यरत आहेत. मुंबई, पुणे यासह राज्यभर करोनावर काही प्रमाणात मात करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील परिस्थिती सुधारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षाचे काम करताना सरकारचं कौतुक करणं बहुतेक त्यांना मान्य नाही. त्यामुळे ते टीका करत असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.