संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जयंत पाटीलांची जोरदार फटकेबाजी; म्हणाले, अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून..

0 1

सांगली : वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे पुन्हा एकदा चांगलेच वादाच्या भौऱ्यात सापडले आहेत. कोरोना विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

कोरोनामुळे जी माणसे मरतात, ती जगायच्या लायकीची नाहीत असे विधान संभाजी भिडेंनी केले होते. भिडे यांनी कोरोनाच्या मोहीमेविरोधात जे शब्द वापरले त्याचा समाचार काल (ता. ११) रोजी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला आहे.

दरम्यान, राज्य सरकार आणि समाज कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करत आहे. अशावेळी आंबे खाल्ल्यावर मुले होतात, अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून गैरसमज करणारी विधाने होत असतील तर ते अयोग्य आहे. एरवी अशी वक्तव्ये खपून जातात. पण सध्याच्या कोरोनाच्या गंभीर आणि महत्वाच्या काळात अशा वक्तव्यांमुळे त्या संकटाचे गांभीर्य कमी होते.

कोणीही उठून काहीही बोलायला लागले तर सरकार आणि समाजाकडून सुरु असणाऱ्या प्रयत्नांमध्ये बाधा निर्माण होईल. त्यामुळे अशी वक्तव्ये कायद्याच्यादृष्टीने तपासून त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे, असे जयंत पाटील यांनी म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते संभाजी भिडे ?

मुळात कोरोना हा रोग नाही आणि कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायकीची नाहीत. कोरोना फक्त एका विशिष्ट प्रवृत्तीच्या लोकांना होतो. त्यामुळे कोरोना हा एक मानसिक आजार असल्याचे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले होते. कोरोनाच्या निर्बंधांमुळे सामान्य नागरिकांनी सरकारविरोधात बंड करावे, असेही आवाहन संभाजी भिडे यांनी केले होते. शासनाचे निर्णय घातकी असून, व्यापारी माती मोल झाले आहेत. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्यांना कवडीमोल अक्कल नाही, असेही संभाजी भिडे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.