पत्रकार सतीश पाटील तेजनकर यांना लागले राजकारणाचे डोहाळे …
सुलतानपूर :-
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत.व इच्छुक उमेदवारांनी मतदार राजासोबत आपल्या भेटीगाठी सुद्धा सुरू केल्या आहेत. परंतु सुलतानपूर सर्कलचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण अजून निश्चित झाले नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला पाहावयास मिळतो.
लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथील पत्रकार क्षेत्रात अग्रेसर असणारे व विविध क्षेत्रातून तसेच कै. परमेश्वर उत्तमराव तेजनकर पाटील बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे तरुण तडफदार नेतृत्व सतीश पाटील तेजनकर यांना राजकारणाचे डोहाळे लागल्याचे दिसून येत आहे.गेले कित्येक दिवसापासून सतीश पाटील तेजनकर यांनी सर्कल मधील वेगवेगळ्या गावांना व सामाजिक कार्यक्रमांना भेटीगाठी देऊन पंचायत समिती च्या निवडणुकीसाठी आपली जय्यत तयारी सुरु केल्याची पाहावयास मिळते.परंतु नेमके अंजनी की सुलतानपूर सर्कल साठी व कोणत्या पक्षाकडून ते आपली उमेदवारी मागणार हे अजून समोर आले नाही.
सतीश पाटील तेजनकर यांचे मनोगत
मी व माझी संपूर्ण फॅमिली गेले कित्येक वर्षापासून समाज कार्यामध्ये सदैव अग्रेसर असतो.व आमच्या कै. परमेश्वर उत्तमराव तेजनकर पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेले समाजकार्य चांगले असून आता संस्थेच्या अध्यक्षा शारदा वानखेडे किंवा उपाध्यक्ष शोभा परमेश्वर तेजनकर यांच्यासाठी पक्षाला उमेदवारी मागणार आहे.व आरक्षणानुसार उमेदवारीसाठी मला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला तरीही माझ्या नौकरीचा राजीनामा देऊन राजकारणात सक्रिय होऊन मला जनतेचा जनसेवक होण्यास आवडेल.