पत्रकाराला मारहान करूण जिवे मारण्याची धमकी

0 92

शंकरपूर प्रतीनीधी : –

पुयारदंड येथील आंबोली क्षेत्राचे सकाळ मिडियाचे प्रतिनिधी यांना ग्रामपचायतीच्या शिपाई पदभरती संदर्भात,सचिवाच्या विरोधात बातम्या का लावल्या या रागामुळे ग्रामसचिवाच्या बाजुने असलेल्या व्यक्तीकडून जाधव याचा काटा काढण्यासाठी मारहान करूण जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणात जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून भिसी पोलीसांनी पुयारदंड येथील तिन व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
सविस्तर वृत्त असे की भिसी शंकरपूर हायवेच्या दोन्ही बाजूला कच्चे नालीकाम करुण त्यात शेतकरी व गावकरी याना ये जा करण्यासाठी व रोडचे पाणी गावकर्यांच्या घरात जावू नये यासाठी सा.बा.विभाग चिमूरकडून सिमेंटचे पाईप टाकणे चालू आहे . यामधे गावातील काही प्रस्थापितानी आपल्या मनमर्जीने ग्रामपंचयतीला विचारात न घेता पाईप टाकूण घेतले . त्यापैकी आरोपी गोलू बल्की यांनी आपल्या घरा मागे गरज नसतानीसुद्धा पाईप टाकायला लावले तसेच सार्वजानिक रस्तावर टाकण्यासाठी आनलेले पाईप स्वतःच्या शेतासमोर टाकले. याबददल गोलू बल्की याला विचारले असता मी पाईप टाकण्यासाठी ठेकेदाराला पैसे दिले आहे असे उत्तर मिळाले .
शेतकऱ्यांच्या या सांगण्या वरुण राजेंद्र जाधव यांनी पत्रकार या नात्याने संबधीत ठेकेदाराशी चर्चा केली तर त्यांनी आम्ही पाईप टाकण्याचे पैसे घेत नाही ते आमचे काम आहे असे उत्तर जाधव यांना मिळाले .
संबधीत प्रकरणाचा खरे खोटे करण्यासाठी पाईप टाकणारे सुपरवायझर आकाश कलंत्री यांचे सोबत राजेद्र जाधव पत्रकार स्पॉटवर गेले . परंतु तेथे गोलू बल्की हजर नव्हता त्या ऐवजी गो लूचा भाऊ मिलिंद बल्की हजर होता . पाईप टाकण्याचे पैसे घेण्याच्या मुद्यावर चर्चा चालू असतानी मिलिद बल्की यांनी आपला भाऊ गोलू बल्की व चुलत भाऊ मंगेश बल्की याला बोलावून राजेंद्र जाधव यांना अश्लिल शिविगाळ करूण मारहाण करण्यास सुरुवात केली. मिलिंद बल्की , गोलू बल्की यांनी अश्लील शिवीगाड करून जिवे मारण्याची धमकी दिली .
तू पत्रकार अससील , आम्ही पत्रकाराला मोजत नाही , तुला आम्ही मारल ,तु काय करतेस ते पाहूण घेवू . अशी धमकी दिली . तू ग्रामपंचापतच्या शिपाई पद भरतीच्या व ग्रामसेविकाच्या विरोधात बातम्या का लावलास , तुला सत्ता पार्टीकडून कमीशन भेटत असेल असे आरोप करीत राजेंद्र जाधव यांना मिलिंद बल्की,गोलू बल्की , मंगेश बल्की यांनी मारहान केली .
यामधे राजेंद्र जाधव यांना कानावर व मानेवर हाताच्या मुठीने ( पंच )झालेल्या वारामुळे डाव्या कानाला ऐकू येत नाही व डाव्या डोळ्याला अंधारी येत आहे .


संबधीत प्रकरणाची पोलीस स्टेशन भिसी येथे तक्रार नोंदविण्यात आली असून राजेंद्र जाधव यांना मेडीकल साठी आरोग्य केंद्र भिसी येथे पाठविण्यात आले .त्यामधे कानावर जबर मार असल्पामुळे डॉ. कष्टी मैडम यांनी कानाच्या तपासणी साठी जिल्हा सामान्य रुगनालय चंद्रपूर येथे ENT टेस्ट कानाचे व डोळ्याचे MR करण्यासाठी रेफर केले आहे .
पोलीस स्टेशन भिसी येथे मिलिंद बल्की, गोलु बल्की व मगेश बल्की यांचे विरोधात ‘तक्रार नोंदवून भारतीय दंड संहीत १८६० नुसार कलम २९४ , ५०४ , ५०६ , ३२३ व ३४ लावून गुन्हे दाखल करण्यात आले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.