खडसे, मुंडे, तावडेंची ‘…याद करो कुर्बानी’, भाजपच्या बॅनरबाजीवर काँग्रेसने लावले बॅनर, VIDEO

विशेष म्हणजे, भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकात हे चक्काजाम आंदोलन होत आहे.

0 34

नागपूर, 26 जून : स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी आरक्षण (obc reservation)  रद्द झाल्यामुळे भाजपच्या वतीने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन सुरू आहे. नागपूरमध्येही भाजपने चक्का जाम आंदोलनाची (bjp obc chakka jam protest) तयारी केली आहे. पण, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे (eknath khadse), पंकजा मुंडे (pankaja munde), विनोद तावडे  या ओबीसी नेत्यांसोबत भाजपने काय केलं? असा सवाल करत भाजपच्या बॅनरवर बॅनर लावून एकच धुरळा उडवून दिला. (bjp protest against obc reservation)

नागपूरच्या व्हेरायटी चौक इथं भाजपकडून चक्का जाम आंदोलन केले जात आहे. यावेळी उड्डाणपुलावर भाजपने चक्का जाम आंदोलनाचे भलेमोठे बॅनर लावले होते. या बॅनरवर युवक काँग्रेसचे नेते अक्षय अरुण हेटे यांनी एक बॅनर लावले.

या बॅनरवर एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे व सुधाकर कोहळे यांचे फोटो बॅनरवर लावून भाजप ने या ओबीसी नेत्यांसोबत काय केले हा प्रश्न उपस्थित केला. या नेत्यांच्या फोटोवर ‘जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बांनी’ असा मजकूरही लिहिला आहे.

हे बॅनर पाहिल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. एका कार्यकर्त्याने पुलावर जाऊन हे बॅनर काढून टाकले. नंतर पोलिसांनी धाव घेऊन हे बॅनर जप्त केले. पण, घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती.

विशेष म्हणजे, भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकात हे चक्काजाम आंदोलन होत आहे. यासाठी मोठया संख्येने भाजपचे कार्यकर्ते आंदोलन ठिकाणी जमले आहे.

पंकजा मुंडे आंदोलनात सहभागी

दरम्यान, पुण्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी चक्काजाम केल्यानंतर  परळीमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलन सुरू आहे. चक्काजामला जाण्यापूर्वी खासदार प्रीतम मुंडे यांनी ओबीसीचे नेते स्व गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. बीड जिल्ह्यात तब्बल 24 ठिकाणे चक्का जाम आंदोलन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये तगडा पोलिस बंदोबस्त केला असून आंदोलनामध्ये अनुचित प्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

चक्काजाम नंतर राज्य सरकारनेओबीसी अरक्षणा संदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन तीव्र असेल असा इशारा खासदार प्रीतम मुंडे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.