खामगाव : आयपीएल मॅचवर सट्टा; एकास अटक

0 16

खामगाव : आयपीएल मॅचवर सट्टा खेळणाऱ्या एका इसमास शिवाजीनगर पोलिसांनी रेखा प्लॉट भागातून अटक केली आहे. ही  कारवाई बुधवारी उशिरा रात्री करण्यात आली.

मिळालेल्या .माहितीच्या आधारे, शिवाजीनगर पोलिसांनी बुधवारी रात्री रेखा प्लॉट भागातील प्रकाश गोपीनाथ सोनी याच्या घरी छापा मारला. यावेळी प्रकाश सोनी आयपीएलच्या मॅचवर सट्टा खेळताना व खेळविताना मिळून आला.

यावेळी पोलिसांनी सोनी यास अटक करून त्याच्याजवळून सट्टा खेळण्याचे साहित्य, टीव्ही, दोन मोबाइल, यूसीएन एक्सटेन्शन बॉक्स, रिमोट व रोख ७३० रुपये असा एकूण १५,५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त C केला. याप्रकरणी प्रकाश सोनी याच्याविरुध्द कलम ४५ मजुकानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.