खेडोपाडी प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगावचे करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोमाने सुरू

0 2

शेगांव :
प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगांव अंतर्गत असलेल्या खेडोपाडी कोरोना प्रतिबंधक लसीकरण व जनजागृती करण्याचे कार्य आरोग्य विभागातील कर्मचारी दिवसरात्र जोमाने करत आहेत.या मोहिमेमध्ये ग्रामस्थ सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन लसीकरण करून घेतांना दिसून आहे.
जि.प.शाळा सगोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगावच्या वतीने दि.१७ एप्रिल रोजी वैद्यकीय अधिकारी डाॅ.डी.पी.कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना लसीकरण शिबिर संपन्न झाले असता कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला डोस ११७ लाभार्थ्यानी तर दुसरा डोस एका लाभार्थ्यानी घेतला आहे.

लसीकरण नोंदणी करतांना ग्रामस्थ व आरोग्य विभागातील कर्मचारीयाप्रसंगी करोना लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ.एल.डब्ल्यू राठोड,एस.आर.भोबंळे,आरोग्य सेवक भांडे,मो.शाहिद,श्रीमती हांडे, श्रीमती शिवदे,आर.पी.निखाडे,आरोग्य सहाय्यक इंगोले,डाबेराव,श्रीमती घोपे, मुख्याध्यापक एस.डी. डाबेराव,ग्रामसेवक पाटील,तलाठी डाबेराव यांनी अथक परिश्रम घेतले.

कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीचे लसीकरण करतांना वयोवृद्ध ग्रामस्थ

Leave A Reply

Your email address will not be published.