मासिक कमाईसाठी Post Office ची ही योजना बेस्ट! दरमहा मिळतील 5000 रुपये

गुंतवणूक म्हटलं की चांगला परतावा (Good Return) प्रत्येकालाच हवा असतो. त्यातही पैसे बुडणार नाहीत ही हमी हवी असेल तर सरकारी योजना सर्वांत बेस्ट. लोक सरकारी बँकांत फिक्स्ड डिपॉझिट ठेवतात नाहीतर दुसरा पर्याय भारतीय पोस्ट ऑफिस. जाणून घ्या पोस्टाच्या आणखी एका महत्त्वाच्या योजनेबाबत

0 198

नवी दिल्ली : गुंतवणूक म्हटलं की चांगला परतावा (Good Return) प्रत्येकालाच हवा असतो. त्यातही पैसे बुडणार नाहीत ही हमी हवी असेल तर सरकारी योजना सर्वांत बेस्ट. लोक सरकारी बँकांत फिक्स्ड डिपॉझिट ठेवतात नाहीतर दुसरा पर्याय भारतीय पोस्ट ऑफिस.

पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम्समध्ये (Post Office Saving Schemes) तुम्हाला निश्चित परतावा मिळतो आणि त्या योजनेत तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. तुम्हाला जर दरमहा कमाई (Regular Income) करायची असेल तर पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (Monthly Income Scheme-MIS) हा चांगला पर्याय आहे. यात कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. या छोट्या बचत योजनेच्या माध्यमातून दरमहा नक्की 4950 रुपयांची कमाई करू शकता. या योजनेत तुम्हाला सिंगल (Single Account) किंवा जॉइंट अकाउंट उघडता येतं. जाणून घेऊया या स्कीमबद्दल सविस्तर…

पैशांच्या सुरक्षिततेची हमी सरकारची

पोस्टाच्या या मासिक उत्पन्न योजनेत सिंगल किंवा जॉइंट कुठल्याही प्रकारच्या अकाउंटमध्ये एक निश्चित रक्कम जमा करावी लागते. तुमच्या खात्यात दरमहा किती रुपये जमा होणार हे या रकमेवर अवलंबून आहे. या योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते ती नंतर 5 वर्षांच्या अंतराने वाढवता येते. तुमच्या गुंतवणुकीची सगळी रिस्क सरकार उचलत असल्याने तुम्ही निश्चिंतपणे गुंतवणूक करू शकता. या तिमाहीसाठी सरकारनी या स्किमसाठी 6.6 टक्के वार्षिक व्याजदर निश्चित केला आहे.

योजनेबाबत महत्त्वाची माहिती

-योजना: मंथली इन्कम स्कीम (MIS)

-व्याज: 6.6टक्के वार्षिक

-कमीतकमी गुंतवणूक: 1000रुपये

-जास्तीत जास्त (सिंगल अकाउंट): 4.5लाख रुपये

-जास्तीत जास्त जमा (जॉइंट अकाउंट): 9लाख रुपये

-जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 3 जण असू शकतात, तरीही ते वर्षाला जास्तीत जास्त 9 लाख रुपयेच जमा करू शकतात.

-10 वर्षांहून मोठ्या अल्पवयीन मुलगा किंवा मुलीसाठी पालकांच्या नावे खातं उघडता येतं.

-या योजनेत मॅच्युरिटी पिरियड 5 वर्षेआहे, पण नंतर 5 वर्षांसाठी तो वाढवता येतो.

मासिक रक्कम कशी मोजतात?

या योजनेत तुम्हाला एकदाच गुंतवणूक करायची असते. गुंतवणूक केलेल्या रकमेवर वार्षिक व्याजानुसार जी रक्कम येते तिला 12 भागांत विभागून ती रक्कम दरमहा तुमच्या खात्यात जमा केली जाते.

5000रुपये दरमहा कसे मिळतील?

तुम्ही पोस्टात जॉइंट अकाउंट (Joint Account) उघडलं तर-

-जॉइंट अकाउंटअंतर्गत एकरकमी गुंतवणूक: 9लाख रुपये

-वार्षिक व्याज: 6.6टक्के

– 1वर्षाच्या व्याजाची रक्कम:59400रुपये

-दरमहा व्याज: 4950रुपये

सिंगल अकाउंट असेल तर-

-एकरकमी गुंतवणूक:4.5लाख रुपये

-वार्षिक व्याज: 6.6टक्के

-1वर्षाचं व्याज: 29,700रुपये

-दरमहा व्याज: 2475रुपये

खातं कसं उघडायचं?

-जवळच्याPost Officeमध्ये बचत खातं उघडा.

-ओळखपत्र म्हणून आधार कार्ड (Aadhar Card), पासपोर्ट (Passport), मतदान ओळखपत्र (Voter ID) किंवा ड्राइव्हिंग लाइसन्स (Driving Licence) सोबत ठेवा.

-2पासपोर्ट साइज फोटो देखील आवश्यक

-पत्त्याचा पुरावा म्हणून सरकारी यंत्रणेनी दिलेलं ओळखपत्र किंवा सेवेचं बिल सोबत न्या.

-पोस्ट ऑफिसात जाऊन मंथली इन्कम स्कीमचा अर्ज भरा तो अर्ज ऑनलाइन डाउनलोडही करता येतो.

-हा अर्ज आणि डॉक्युमेंटस दिलीत की तुमचं खातं सहज उघडलं जातं.

-अर्जावर नॉमिनीचं नाव द्यायला पाहिजे.

-खातं उघडण्यासाठी सुरुवातीला1000रुपये रोख भरावे लागतील तरच हे खातं उघडलं जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.