Aadhar Card ला लिंक केलेला मोबाइल क्रमांक विसरला आहात का? अशाप्रकारे माहीत करून घ्या

Aadhar Card हा महत्त्वाचा दस्तावेज असल्याने आधारशी कोणता मोबाइल नंबर (Mobile Registered with Aadhar Card) लिंक केला आहे, हे लक्षात ठेवणंदेखील आवश्यक आहे. पण समजा, तुम्ही तुमच्या आधार कार्डशी जोडलेला तुमचा मोबाइल नंबर विसरलात तर काळजीचं कारण नाही.

0 20

नवी दिल्ली : आजकाल प्रत्येक कामासाठी आधार कार्डची (Aadhar Card) आवश्यकता भासते. बँकेशी संबंधित काम असो किंवा अन्य कोणतीही सरकारी काम,  सगळीकडे आधारकार्ड महत्त्वाचं असतं. त्यामुळं आपण आपल्या आधारशी कोणता मोबाइल नंबर (Mobile Registered with Aadhar Card) लिंक केला आहे, हे लक्षात ठेवणंदेखील आवश्यक आहे. पण समजा, तुम्ही तुमच्या आधार कार्डशी जोडलेला तुमचा मोबाइल नंबर विसरलात तर काळजीचं कारण नाही. केवळ दोन मिनिटांत तुम्ही आधारशी जोडलेला नोंदणीकृत मोबाइल नंबर शोधू शकता. त्यासाठी खाली दिलेली प्रक्रिया करा.

रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक विसरलात तर काय कराल?

– सर्वात आधी तुम्हाला यूआयडीएआयच्या (UIDAI ) https://uidai.gov.in/  या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

-या वेबसाइटच्या डॅशबोर्डवर असलेल्या My Aadhar कॅटेगरीत जावे लागेल.

– त्यानंतर Aadhar Services  या पर्यायावर क्लिक करा.

– व्हेरीफाय ईमेल / मोबाइल नंबर असं विचारणारी नवीन विंडो दिसेल.

– या विंडोमध्ये आपला आधार नंबर आणि मोबाइल नंबर भरा.

– यानंतर कॅप्चा भरा आणि ओटीपी जनरेट करा. ओटीपी जनरेट करताच एक मेसेज येईल.

– तुमचा मोबाइल नंबर आधीपासून नोंदणीकृत असेल तर The Mobile you have entered already verified with our records असा मेसेज दिसेल. याचा अर्थ तुमचा  मोबाइल नंबर आधीपासूनच आधारशी जोडलेला आहे.

– मोबाइल नंबर आधीपासून नोंदणीकृत नसेल तर The Mobile number you had entered does not match with our records असा संदेश येईल. त्यावरून तुमचा दुसरा मोबाइल नंबर आधारशी जोडला आहे, हे लक्षात येईल. मोबाईल नंबरप्रमाणे, नोंदणीकृत ईमेल आयडीदेखील अशाच पद्धतीनं जाणून घेता येईल.

नवीन आधारची वैशिष्ट्ये :

यूआयडीएआयने आता नवीन आधार कार्ड जारी केली आहेत. दर्जेदार प्रिटिंग आणि लॅमिनेशन असलेली ही पीव्हीसी प्रकारची कार्ड असून ती कोणत्याही हवामानात खराब होत नाहीत. पावसातदेखील ती पूर्ण सुरक्षित राहतात. ही कार्ड्स अतिशय आकर्षक आणि टिकाऊ आहेतच त्याचबरोबर होलोग्राम, गिलोच पॅटर्न, घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स्ट अशी अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्येदेखील यात आहेत. अवघ्या 50 रुपयात ही नवीन सुरक्षित आधारकार्ड उपलब्ध असून, ती ऑनलाइन मागवता येतात.

Leave A Reply

Your email address will not be published.