कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा

अध्यक्षपदासाठी जोरदार चुरस दिसत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे

0 6

पदाधिकारी बदलांना वेग

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी अखेर गुरुवारी राजीनामा दिला आहे. विभागीय आयुक्तांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला. उपाध्यक्ष व सभापतींचे राजीनामे आधीच मंजूर झाले आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाचे राजकारण गतिमान झाले आहे. शिवसेनेच्या तीन सभापतींनी राजीनामे देण्यावरून तर मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर तिन्ही सभापतींनी अध्यक्ष यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनीही राजीनामा दिला आहे. यानंतर अध्यक्ष बजरंग पाटील कधी राजीनामा देणार याकडे लक्ष लागले होते. त्यांनी आज आपला राजीनामा पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर केला. त्यांनी तो मंजूर केला आहे. आता नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू होणार आहे.

अध्यक्षपदासाठी जोरदार चुरस दिसत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे . युवराज पाटील, राहुल पाटील, भगवान पाटील,पांडुरंग भांदिगरे, सरिता खोत यांना अध्यक्षपदाचे वेध लागले आहेत. विजय बोरगे, जयवंत शिंपी यांनी उपाध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी केली आहे. बांधकाम, शिक्षण, समाजकल्याण समितीचे सभापती पद मिळवण्यासाठीही मोठी रांग आहे.

यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा परिषदेतील काँग्रेस—राष्ट्रवादी व शिवसेनेत हालचाली गतिमान झाल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.