मिरची सातरा सुरू करण्याची मजूरदाराची मागणी

0 1

शंकरपुर : येथील मिरची सातरा लॉकडाऊन मुळे बंद आहेत त्यामुळे येथील मजुराचा रोजगार हिरावल्याने हे मिरची सातरा सुरू करण्याची मागणी मजूरदार वर्गाने केलेले आहे. त्यासंदर्भात आज दि 12 ला जवळपास शंभर मजुरदार तलाठी कार्यालयात येऊन धडकल्या होत्या.

शंकरपूर हे गाव दहा हजार लोकवस्ती चे असून या गावात खूप मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग आहे मागील दहा वर्षापासून कायमस्वरूपी दोन मिरची सातरे आहेत या दोन मिरची साताऱ्यावर जवळपास 700 ते 800 मजूर काम करतात या मिरची सातऱ्यावर हुंडा पद्धतीने काम होत असल्याने मजुरदार वर्गाला मजुरी चांगल्या रीतीने पडत आहे परंतु या लॉकडाऊन मध्ये मिरची सातरे प्रशासनाने बंद केल्याने या मजुराचा रोजगार हिरवला आहे .

त्यामुळे आता हातावर आणून पानावर खाने अशी परिस्थिती येथील मजूर दाराची असल्याने जर कामच केलं नाही तर पैसा कुठून येणार घरी काय खाणार या गंभीर प्रश्नाने ते चिंतेत आहे त्यामुळे येथील जवळपास शंभर स्त्री मजूर आज मिरची सातारा सुरू करण्यासाठी तलाठी कार्यालय येथे धडक मारली होती परंतु तलाठी कार्यालय बंद असल्याने महिलांनी तिथेच ठाण मांडले होते ही बाब पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे यांना माहीत होताच हे तिथे आले आणि त्यांनी स्त्री मजुरांना कोरोनाची पार्श्वभूमी समजावून सांगितली

तसेच आपण सर्वांनी कोरोना ची चाचणी करून घ्यावी अशा सूचनाही केल्या व ज्या मजुरदाराची चाचणी निगेटीव्ह येईल त्यांनी मिरची सातरा वर काम करावा अशी सूचनाही त्यांनी स्त्री मजुरवर्गाला केलेली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.