शिरजगाव कसबा यांच्या संयुक्त कामगिरीतून मोटारसायकल चोरीचे मोठे रॅकेट उघड

"पोस्टे चांदुरबाजार पोस्टे ब्राम्हणवाडा थडी, पोस्टे शिरजगाव कसबा''

0 7

मा. पोलीस अधिक्षक साहेब अमरावती ग्रामीण यांनी जिल्हयात होत असलेल्या मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणन्याबाबत सर्व पोलीस स्टेशन ला आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मा. ऊपर पोलीस अधिक्षक साहेब अमरावती ग्रामीण व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब अचलपुर विभाग यांचे मार दर्शनाखाली पोलीस स्टेशन चांदुरबाजार, पोस्टे ब्राम्हणवाडा थंडी, पोस्ट शिरजगाव कसबा यांनी संयुक्त अभियान राबवून चोरी होत असलेल्या मोटारसायकल बाबत तांत्रीक तपास सुरु केला व गुप्त माहीतगार नेमुन माहीतीची जमवाजमव सुरु केली.

मिळालेल्या गोपनीय माहीतीप्रमाणे तसेच तांत्रीक तपासाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून वरील तिन्ही पोलीस स्टेशन च्या अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वप्रथम उज्वल दिलीपराव बोराडे, वय 22 वर्षे, रा. सोनोरी, ता. चांदुर बाजार यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे सदर चोरीस गेलेल्या मोटारसायकल बाबत विचारणा केली असता त्याने चोरी केलेल्या मोटारसायकल हया पवन मनोहर वाहाने, वय 25 वर्षे, रा. माधान, ता चांदुर बाजार यांच्याकडून घेतल्याचे सांगीतले. याबाबत पवन वाहाने यांस ताब्यात घेवून विचारणा केली असता त्याने चोरी केलेल्या आणखी काही मोटारसायकल या संकेत किशोर मेश्राम, वय 21 वर्षे, रा. पिंपरी, ता. चांदुर बाजार हवास व नौशाद अली रहमान शाह, वय 27 वर्षे, रा. शिरजगाव बंड यास दिल्याचे सांगीतले. त्याबाबत तपासाची चक्रे फिल्युन तिन्ही पोस्टे स्तरावर विविध पथके बनवुन नौशाद अली रहमान शाह हयाने चोरीच्या मोटारसायकल आणखी दोन एकटला विक्री करण्याकरिता दिल्याबाबत माहीती मिळाली.

माहीतीच्या आधारे देवानंद विजय नागापुरे वय 28 वर्षे, रा. हैदरापुर बाळा, ता. चांदुरबाजार कएजेंट अन्सार शहा दिलवर शहा वय 27 वर्षे, रा. शिरजगाव बंड, ता. चांदुर बाजार यास ताब्यात घेवून मोठ्याप्रमाणात चोरीच्या दुचाकी जप्त केल्या तसेच वरील सर्व आरोपीकडून माहीती घेतली असता चोरी केलेल्या मोटारसायकलच्या डुप्लीकेट आरसी बनविण्याचे काम सरफराज मन्सुर अली शहा, वय 24 वर्षे रा. शिरजगाव बंड, ता. चांदुर बाजार यांनी केल्याचे तपासात उघड झाले. त्यावरून सदर सरफराज मन्सुर अली शहा यांस पथक पाठवून ताब्यात घेतले असता त्याने चोरीच्या वाहनांची डुप्लीकेट आरसी चनपुन ग्राहकांना देत असल्याचे कबुल केले.

वरील सर्व आरोपीकडून विविध कंपनीच्या एकूण 29 दुबाकी किंमत अंदाजे 20,30,000/- रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केल्या असून आरोपीकडे आणखी विचारपुस करून अधिक दुचाकी जप्त करण्याकरिता पथको रवाना करण्यात आली आहेत. चोरी गेलेल्या मोटारसायकल मो पोस्ट चांदुरबाजार, पोस्टे ब्राम्हणवाडा बढी पोस्टे शिरजगाव कसबा पोस्टे परतवाया, पोस्ट मॉर्शि, पोस्ट शिरोड तसेच पोस्ट बडनेरा, अमरावती शहर व पोस्ट आणि जिल्हा यवतमाळ येथील मोटारसायकल चोरीचे मोठया प्रमाणात गुन्हे उघड झाले आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री हरिबालाजी एन साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. श्याम घुगे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पी.जे. अब्दागिरे। साहेब, अचलपुर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल व्ही. किनगे, सहा. पोलीस निरीक्षक दिपक र वळवी, सहा. पोलीस निरीक्षक पंकज व्ही. दाभाडे, सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पेन्दोर, पो.उपनिरीक्षक संजय व्ही. शिंदे, पो. उपनिरीक्षक राजेंद्र टेकाडे, पो. उपनिरीक्षक दादाराव पंधरे, पोहवा साहेबराव राजस, रविंद्र शिंपी, किसन सपाटे, विनोद इंगळे, मधुकर भास्कर, सुरेश धाकडे, संजय मांडोकार, मालेंद्र रोडे, नापोकों दिनेश वानखडे, कैलास खेडकर, प्रशांत भटकर विरेंद्र अमृतकर, निकेश नशिबकर भुषण पेठे, पुरुषोत्तम माकोडे, विजय आसोलकर, पोको महेश काळे, महेंद्र राउत, राहुल मोरे, नितेश वाघ, अंकुश अरबट, अभय हरदे, विनीत शिरसागर यांनी पार पाडली.

याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात येते की, जिल्हयामचे बनावट आरसी बनवुन जुन्या मोटारसायकल विकी चे रॅकेट उघडकीस आल्याने नागरीकांनी जुन्या गाड्या विकत घेताना कागदपत्रांची जवळच्या पोलीस स्टेशन ला पडताळणी करावी. तसेच संशयीत चोरीच्या दुचाकी बाबत माहीती मिळाल्यास तात्काळ नजीकच्या पोस्टेला माहीती दयावी.

(सुनिल व्ही.किनगे) पोस्टे चांदुर बाजार, कॅम्प ग्राम्हणवाडा थंडी.

Leave A Reply

Your email address will not be published.