लतादीदींची मुख्यमंत्री सहायता निधीला सात लाखांची मदत

गानकोकिळा अशी ख्याती असलेल्या भारतरत्न लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला सात लाख रुपयांची मदत दिली.

0 6

मुंबईः गानकोकिळा अशी ख्याती असलेल्या भारतरत्न लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला सात लाख रुपयांची मदत दिली. कोरोना संकट हाताळण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. lata mangeshkar donate 7 lakh to cm relief fund

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लतादीदींच्या योगदानासाठी त्यांचे आभार मानले. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड १९ मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून सात लाख रुपयांची मदत प्राप्त झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी – कोविड १९ यासाठी दिलेल्या देणग्यांना आयकर अधिनियम १९६१ च्या ८० (जी) नुसार आयकर कपातीतून शंभर टक्के सूट देण्यात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.